#SwineFlu स्वाइन फ्लूच्या संसर्गाने तेरा रुग्ण व्हेंटिलेटरवर

Swine-Flu
Swine-Flu

पुणे - स्वाइन फ्लूच्या ‘एच१-एन१’ विषाणूंचा संसर्ग झाल्याने १३ अत्यवस्थ रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात १ जानेवारीपासून आतापर्यंत ९० स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. 

शहरात यंदा कमाल आणि किमान तापमानातील तफावत जास्त होती. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उशिरापर्यंत रेंगाळलेली थंडी यामुळे विषम वातावरण तयार होते. त्यातून स्वाइन फ्ल्यूच्या विषाणूंचा संसर्ग वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. शहरात अडीच महिन्यांमध्ये स्वाइन फ्ल्यूची प्राथमिक लक्षणे आढळलेल्या दोन हजार ८४२ रुग्णांना टॅमिफ्ल्यू हे औषध दिले.

या रोगाची लक्षणे दिसणाऱ्या गर्भवती, मधुमेही, उच्चरक्तदाब, हृदयविकार असे आजार असलेल्या ५३८ रुग्णांची तपासणी करून स्वाइन फ्ल्यूचे निदान केले. त्यापैकी ९० जणांना स्वाइन फ्ल्यूचे निदान झाले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. स्वाइन फ्ल्यूचे निदान झालेले २५ जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तसेच, १३ रुग्ण अत्यवस्थ असून त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर ठेवले आहे. 

वर्षात १३८ रुग्णांचा मृत्यू
पुण्यात गेल्या वर्षभरात स्वाइन फ्ल्यूच्या १३८ रुग्णांचा मृत्यू झाला. यंदा अडीच महिन्यांमध्ये आठ रुग्ण मृत्युमुखी पडले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com