"स्वाइन फ्लू'वरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पुणे - गेल्या काही महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन नक्की काय करते, या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करीत आहात, असे प्रश्‍न विचारत स्थायी समितीत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. 

महापालिकेचे चालू वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी स्थायी समिती आणि प्रशासतीनल विविध विभागांच्या स्थायीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत बैठका सुरू आहेत. अंदाजपत्रकात आरोग्य विभागासाठी पालिका आयुक्तांनी केलेल्या तरतुदीवर चर्चा सुरू 

असतानाच शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी गेल्या काही महिन्यांत स्वाइन फ्लूच्या आजाराने दगावणाऱ्या रुग्णांबद्दलचा प्रश्‍न उपस्थित करत प्रशासनाकडे खुलासा मागितला. 

वातावरणातील बदलांमुळे या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र, असे असतानाही सध्या सर्वत्र असलेल्या कडक उन्हाळ्यातही या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्युमुखी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. 

प्रशासन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नक्की काय उपाययोजना करते, असा प्रश्न सभासदांनी उपस्थित केला. आरोग्य विभागाने टॅमी फ्लूच्या गोळ्या तसेच लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. 

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून, सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत, असे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी सांगितले. 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे परवाने जप्त 
पुणे, ता. 6 : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या 176 वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून गुरुवारी कारवाई करण्यात आली. त्यापैकी 144 वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यात आले. ते परवाने निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेने मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी या मोहिमेत 249 वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यात आले होते. ते परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात आला आहे. ही विशेष मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले.

Web Title: swine flu in pune