नारायणगाव परिसर तापाने फणफणला

वारूळवाडी (ता. जुन्नर) - छात्रसैनिकांच्या मदतीने पाणीसाठ्याची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ.
वारूळवाडी (ता. जुन्नर) - छात्रसैनिकांच्या मदतीने पाणीसाठ्याची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ.

नारायणगाव - येथील कांचन सुरेश खैरे (वय ३८) या विवाहितेचा स्वाइन फ्लूसदृश विषाणूजन्य आजाराने मृत्यू झाला आहे. नारायणगाव व वारूळवाडी परिसरात दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे. परिसरात सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. बहुतेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णांची निश्‍चित माहिती उपलब्ध होत नाही. खासगी हॉस्पिटलचे डॉक्‍टर माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. 

नारायणगाव येथील कांचन खैरे या शेतकरी महिलेचा १ ऑक्‍टोबर रोजी स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे. 

या महिलेवर येथील हनुमान चौकात राहणाऱ्या युनानी डॉक्‍टरने ॲलोपॅथिक उपचार केले असल्याची चर्चा आहे. नारायणगाव परिसरातील आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथिक डॉक्‍टर परवानगी नसताना ॲलोपॅथिक उपचार करत आहेत. 

कन्सल्टंट डॉक्‍टरची मदत घेऊन आम्ही रुग्ण दाखल करत असल्याची माहिती हे डॉक्‍टर देत आहेत. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज सुमारे दोनशे रुग्णांची तपासणी केली जात आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने वारूळवाडी व नारायणगाव ग्रामपंचायतीने परिसरात फॉगिंग सुरू केली आहे. सबनीस विद्यालयातील छात्रसैनिकांच्या मदतीने तीस पथकाद्वारे१,६६३ घरांची पाहणी करून सुमारे ७ हजार नागरिकांकडे आजाराबाबत माहिती घेतली आहे. या वेळी पाणीसाठ्याची तपासणी केली असता ७३ घरात डास व डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
- डॉ. वर्षा गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी, वारूळवाडी (ता. जुन्नर)

सहा जागा रिक्त 
नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात. ग्रामीण रुग्णालयात करारावर कामास असलेला एक होमिओपॅथिक डॉक्‍टर रुग्णांची तपासणी करून ॲलोपॅथिक औषधे देत असल्याचे आढळून आले आहे. वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्यसेविका व दोन शिपाई अशा एकूण सहा जागा रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची संख्या पाहता रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com