महापालिका रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लू लसीचा तुटवडा कायम

दीपेश सुराणा
सोमवार, 17 जुलै 2017

- स्वाइन फ्लूचा कसा कराल प्रतिकार : 
* स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्‍टरांचे उपचार घ्यावे. 
* लक्षणे असेपर्यंत शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा. 
* जनसंपर्क टाळावा. पुरेशी विश्रांती घ्यावी. 
* वारंवार हात साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावे. 
* पौष्टिक आहाराबरोबर लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांचा 
आहारात समावेश करावा. 

पिंपरी : राज्य सरकारकडून स्वाइन फ्लू लसीचा सध्या अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील महापालिका रुग्णालये व दवाखान्यांमध्ये त्याचा तुटवडा कायम आहे. त्याबाबत वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे. 

महापालिका रुग्णालये व दवाखाने यांच्यासाठी आवश्‍यक स्वाइन फ्लूची औषधे, लस व इतर साधनसामग्रीचा पुरवठा शासनाकडून होतो. हा पुरवठा सध्या अल्प प्रमाणात होत आहे. तुलनेत स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. गरोदर माता, गंभीर आजारी रुग्ण, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, लहान मुले यांना स्वाइन फ्लू लसीची अत्यंत आवश्‍यकता आहे. मध्यवर्ती औषध भांडार विभागातील त्याचा साठा संपलेला आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून महापालिकेने दोन हजार लसीची खरेदी खासगी पुरवठादार संस्थेकडून केली. त्याशिवाय, 2017-18 या आर्थिक वर्षासाठी शासन दराने स्वाइन फ्लूची लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास नुकतीच स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. 

महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी (ता.15) स्वाइन फ्लू व डेंगी आजाराच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. संबंधित आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर काळजे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

- शहरातील स्वाइन फ्लूची सद्य:स्थिती (1 जानेवारी ते 16 जुलै 2017) : 
* लागण झालेले रुग्ण : 175 
* टॅमिफ्ल्यूच्या गोळ्या दिलेले रुग्ण : 6027
* घशातील स्त्रावाचे नमुने तपासलेले रुग्ण : 370 
* मृत्यू झालेले रुग्ण : 22 

- स्वाइन फ्लूची लक्षणे : 
* सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी/ उलट्या व जुलाब. 

- स्वाइन फ्लूचा कसा कराल प्रतिकार : 
* स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्‍टरांचे उपचार घ्यावे. 
* लक्षणे असेपर्यंत शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा. 
* जनसंपर्क टाळावा. पुरेशी विश्रांती घ्यावी. 
* वारंवार हात साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावे. 
* पौष्टिक आहाराबरोबर लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांचा 
आहारात समावेश करावा. 

"स्वाइन फ्लू लसीचा सध्या तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून पुढील 15 दिवसांमध्ये हा पुरवठा होईल.'' 
- डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण रुग्णालय. 

Web Title: swine flu vaccine in pimpri chinchwad