स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण पिंपरीत आढळले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पिंपरी : वातावरणातील बदलांमुळे शहरात थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात शुक्रवारी (ता. 30) एक स्वाइन फ्ल्यूसदृश रुग्ण आढळला. त्याचे घशातील द्रव पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

शहरातील खासगी, महापालिका रुग्णालय व दवाखान्यात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची गर्दी होत आहे. पालिका रुग्णालयांत ऑगस्टमध्ये आतापर्यंत चार हजार 758 तापाचे रुग्ण आढळले. त्यापैकी 88 जणांच्या घशातील द्रव पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. दमट वातावरणात स्वाइन फ्ल्यू वाढण्याची शक्‍यता असते, त्यामुळे गरजेनुसार 34 जणांना टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. बुधवारी (ता. 28) तीन स्वाइन फ्ल्यूसदृश रुग्ण आढळले होते, तर 19 जणांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आज पुन्हा एक स्वाइन फ्ल्यूसदृश रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swineflu affected person found in pcmc