pune : सय्यदनगर रेल्वेगेटजवळील नागरिकांच्या घरात पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

pune : सय्यदनगर रेल्वेगेटजवळील नागरिकांच्या घरात पाणी

उंड्री : रस्ता केल्यानंतर पावसाळी वाहिनी करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले तर कोणी भरपाई देत नाही. रस्त्याचे काम योग्य पद्धतीने केले की नाही, याची पाहणी अधिकारी-इंजिनिअर्स का करीत नाहीत, असा संतप्त सवाल हांडेवाडी रोड-सय्यदनगरमधील नागरिकांनी उपस्थित केला.

सय्यदनगर रेल्वे गेट क्र.७- हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर-सय्यदनगरमधील पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. सय्यदनगर रेल्वेगेट क्र.७ बंद केले असून, हांडेवाडीकडे जाण्यासाठी आणि महंमदवाडीकडून येण्यासाठी एकेरी मार्ग केला आहे. मात्र, अनेक वाहने विरुद्ध दिशेने सय्यदनगर रेल्वेगेटकडे येत असल्याने वाहतूककोंडी होऊन अपघातसदृस्थिती निर्माण होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

पालिका प्रशासनाकडे रस्ता करताना पावसाळी वाहिनी टाकण्यासाठी लेखी-तोंडी तक्रारी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे. मात्र, सामान्य नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जाते. हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगरपर्यंत पावसाळी वाहिनी टाकली आहे. मात्र, ही पावसाळी वाहिनी ओढ्यापर्यंत नेली नाही. अर्धवट पावसाळी वाहिनी टाकून काय साध्य केले, असा संतप्त सवाल येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला.

लोकप्रतिनिधी या भागातील विकासासाठीचा निधी दुसरीकडे नेला जातो. निवडणुकांच्या वेळी सर्वच पक्षाच्या उमेदवारापासून कार्यकर्त्यांची जंत्री आश्वासनांची खैरात घेऊन येतात. मात्र, निवडणुका झाल्या की, आश्वासने हवेत विरत असल्याचे सांगत येथील महिला नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

भंवरलाल चौधरी, सय्यदनगर

रस्ता केल्यानंतर पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था असली पाहिजे, ही बाब सामान्य नागरिकांना कळते. तर प्रशासनातील अधिकारी-इंजिनिअर्सना समजत नाही का, नागरिक कर भरतात, ती चूक करतात का, दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजविले जातात, त्यामुळे रस्ता वर आणि घरे खाली अशी अवस्था झाल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते.

मीना थोरात, सय्यदनगर

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, रस्ता, पावसाळी वाहिनीचे काम मुख्य खात्याकडून केले जाते. त्यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच मार्गी लावले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Syednagar Railway Gate Road Traffic Citizens Anger Municipality

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..