तबला हे भारतीय वाद्य - उमेश मोघे

Tabala
Tabala

पुणे - ‘तबला या वाद्याचे शिल्प हे इसवी सन पूर्व पाचपासून बारापर्यंत मध्य आणि दक्षिण भारतात उपलब्ध आहे. यातून तबला वाद्याच्या प्राचीनतेची साक्ष मिळते,’ असे मत दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पंडित उमेश मोघे यांनी व्यक्त केले.

‘देहली का तबला’ या मोघे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. या वेळी पंडित सुरेश तळवलकर, पंडित नयन घोष, डॉ. हेरंबराज पाठक उपस्थित होते. मोघे म्हणाले, ‘‘नाट्यशास्त्रामधील त्रिपुश्‍करमध्ये तबला वाद्याचे अस्तित्व आहे. तबला वादकधारी समाजाचा इतिहास आणि देहलीच्या खलिफांचे विस्तार क्रियावरील विचार व विवेचन या मुद्द्यांच्या आधारावर या पुस्तकाची मांडणी केली आहे.’’ पंडित तळवलकर म्हणाले, ‘‘मोघे यांनी कला तत्त्वाशी जास्त प्रामाणिक राहून जुन्या गोष्टी संशोधन करून नवीन रूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. उत्तम तबलावादक, अभ्यासक व श्रेष्ठ गुरू या तिन्ही प्रांतांत त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.’’

पं. नयन घोष म्हणाले, की मोघे यांनी उपलब्ध साहित्याचा परामर्श घेऊन त्यातून नवीन सत्य स्थापित केले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर गिरीश गोगटे यांचे बहारदार सोलो तबलावादन झाले. ज्येष्ठ तबलावादक पं. प्रमोद पाटील, पं. विठ्ठलराव क्षीरसागर, पं. पांडुरंग मुखडे, पं. सत्यशील देशपांडे, पं. रामदास पळसुले, शारंगधर मराठे, पं. विवेक जोशी, पं. संजय गरुड उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com