टाकवे बुद्रुक नजिकच्या डोंगरवस्तीला तहसीलदारांचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

'सकाळ'ने या रस्त्यावर पडलेल्या खराळ आणि दगडी रस्त्यावर आल्याने पायथ्याशी असलेल्या मोरमारेवाडीकरांचा जीव टांगणीला लागला असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने या धोकादायक स्थितीचा पंचनामा करून रस्त्यावर आलेले दगड, खराळ उचलण्याचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू केले होते.

टाकवे बुद्रुक - मोरमारेवाडी डोंगरवाडी, सटवाईवाडी, हेमाडेवस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावर दगड आणि खराळ पडलेल्या भागाची पाहणी तहसीलदार रणजित देसाई यांनी केली. तूर्तास हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात यावा. तसेच खराळ आणि दगड पडलेल्या रस्त्यावर उपाय योजना करावी, असा आदेश तहसीलदार देसाई यांनी दिला.

'डोंगरवाडीला पायी जाणाऱ्या नागरिकांनी धोका पत्करून पायी प्रवास न करता त्यांनी गावात रहावे. गरज पडल्यास गावकऱ्यांची दहा दिवस शासकीय योजनेतून राहण्याची व्यवस्था पायथ्यालगतच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात येईल. नाणोलीच्या डोंगर पदावरून इनरकाॅन कंपनीच्या पर्याय मार्गाचा पठारावरील नागरिकांनी वापर करावा,' असा पर्याय देसाई यांनी सुचविला आहे.

'सकाळ'ने या रस्त्यावर पडलेल्या खराळ आणि दगडी रस्त्यावर आल्याने पायथ्याशी असलेल्या मोरमारेवाडीकरांचा जीव टांगणीला लागला असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने या धोकादायक स्थितीचा पंचनामा करून रस्त्यावर आलेले दगड, खराळ उचलण्याचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू केले होते.

आज तहसीलदार देसाई यांनी या रस्त्याची पाहणी करून आवश्यक सुचना दिल्या. यावेळी सरपंच गुलाब गभाले, मंडल अधिकारी एम. व्ही. खोमणे तलाठी एस. ए. मलबारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते. रस्ता करण्यासाठी डोंगर फोडून वळणदार रस्ता डोंगरवाडीच्या जवळपास पोहचला आहे. त्यावर डांबरीकरणाचा पहिला थर मारला आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह पर्यटक या रस्त्याने पठारावर जात आहे. पण पहिल्या पावसाने माती मुरूम कोसळून खराळ पडले. दगडी रस्त्यावर आल्या. रस्त्याला भेगा पडल्या त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली. गावकरी भीतीच्या दडपणाखाली वावरू लागली.

'सकाळ'ने हा प्रश्न मांडल्यावर जागे झालेल्या प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या. आज तहसीलदार देसाई यांनी पाहणी केली. रस्त्याच्या बाजूच्या धबधब्यात मुरुम, माती, दगडी टाकल्या होत्या. धबधबा पाण्याने वाहू लागल्याने मुरूम माती पायथ्याशी असलेल्या भात खाचरात वाहून देवजी गवारी, गुलाब गवारी, दुंदा गवारी, किसन गवारी, संतू गवारी या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, याबाबत देसाई यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचे आश्वासन दिले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Tahasildaar meets takve budruk village