दाखल्यांसाठी जादा कर्मचारी नियुक्त

आकुर्डी - विविध दाखल्यांसाठी तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील नागरी सुविधा केंद्रात झालेली गर्दी.
आकुर्डी - विविध दाखल्यांसाठी तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील नागरी सुविधा केंद्रात झालेली गर्दी.

पिंपरी - सरकारी नोकरभरती, शिक्षणासाठी जात, उत्पन्न, नॉन-क्रिमीलेअर आणि रहिवासी आदी दाखल्यांसाठी आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील नागरी सुविधा केंद्रात रोज २०० ते २५० अर्ज येत आहेत. दाखले वेळेत मिळावेत, यासाठी तहसीलदार कार्यालयाने चार ते पाच जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

सर्व दाखले वर्षभरात कधीही मिळतात. शाळा, महाविद्यालयीन प्रवेशासाठी नागरिकांनी एप्रिलपासून www.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार कार्यालयाने केले होते. मात्र, निकाल लागल्यानंतर दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. त्यातच पोलिस भरतीसह विविध सरकारी नोकऱ्यांसाठी जूनमध्ये संबंधित उमेदवारांची गर्दी होत आहे. 

१ एप्रिल ते २० जून या कालावधीत उत्पन्नासाठीचे तीन हजार ४७ अर्ज आले. त्यापैकी दोन हजार ९२ जणांना दाखल्यांचे वाटप झाले. जातीच्या दाखल्यासाठी १७७ अर्ज आले. त्यापैकी ११३ जणांना वाटप झाले. नॉन-क्रिमिलेअरसाठी ४२० अर्ज आले. त्यापैकी ३६४ जणांना वाटप झाले. रहिवासी दाखल्यासाठी ९७५ जणांचे अर्ज आले. त्यापैकी ९३६ जणांना वाटप केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com