तंटामुक्तीसाठी 1 मे रोजी मूल्यांकन: गिलबिले

युनूस तांबोळी
शनिवार, 21 एप्रिल 2018

टाकळी हाजी (पुणे): "यंदा अकराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानास काहींशी मरगळ आली होती. मात्र, सरकार याबाबत सकारात्मक असल्याने येत्या 1 मे रोजी उर्वरित गावांचे मूल्यांकन होणार आहे,'' अशी माहिती तंटामुक्तीचे जिल्हा समन्वयक उत्तम गिलबिले यांनी दिली.

टाकळी हाजी (पुणे): "यंदा अकराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानास काहींशी मरगळ आली होती. मात्र, सरकार याबाबत सकारात्मक असल्याने येत्या 1 मे रोजी उर्वरित गावांचे मूल्यांकन होणार आहे,'' अशी माहिती तंटामुक्तीचे जिल्हा समन्वयक उत्तम गिलबिले यांनी दिली.

गावातील तंटे गावातच मिटवावेत, यासाठी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी "महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान' ही योजना सुरू केली होती. यामुळे गावातच किरकोळ, फौजदारी, दिवाणी व महसुली तंटे मिटविण्याचे काम होऊ लागले. त्याचा परिणाम न्यायालयातील दाव्यांतून दिसून येत होता. गेली 11 वर्षे या योजनेतून मोठ्या प्रमाणात तंटे मिटविण्याचे काम झाले. त्यामुळे गाव पातळीवर तंटामुक्तीच्या अध्यक्षाला महत्त्व प्राप्त झाले होत. या योजनेतून नागरिकांनाही दिलासा मिळू लागल्याने ही योजना यशस्वीपणे सुरू होती. पुणे जिल्ह्यात 1262 ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले होते. सन 2016-17 मध्ये या योजनेला मरगळ आल्याने कोणत्याच प्रकारचे मूल्यांकन झाले नाही. या काळात तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीवरून तंटे निर्माण होऊ लागले होते. त्यामुळे ही योजना बंद करावी, असा सूर उमटू लागला होता.

याबाबत सरकारी पातळीवर विचारणा केली असता ही योजना सर्वसामान्यांच्या हिताची असल्याने एक मे रोजीच्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव अभियानात जिल्हा पातळीवर सहभागी होणाऱ्या 56 ग्रामपंचायतीचे मूल्यांकन होणार आहे. योजनेत सहभाग नोंदविणाऱ्या ग्रामपंचायतीने या बाबत दक्ष राहून कामाचे सादरीकरण करण्याचे आवाहन गिलबिले यांनी केले आहे.

पोलिस पाटलांकडे सोपवावी तंटामुक्ती!
गावागावांत तंटामुक्तीचे अध्यक्ष तंटा मिटविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे पोलिसांचे काम कमी होत आहे. जिल्ह्यात पोलिस पाटलांची नुकतीच भरती झाली आहे. सुशिक्षित पोलिस पाटील यांच्याकडे ही योजना देऊन गावातील तंटे मिटवावेत. त्यासाठी पोलिस पाटील हा अविभाज्य घटक मानला जावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: takali haji uttam gilbile and tanta mukti