esakal | टकारी समाजाच्या मागण्या रास्त - अजित पवार

बोलून बातमी शोधा

बारामती - टकारी समाज बांधवांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार.
टकारी समाजाच्या मागण्या रास्त - अजित पवार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - टकारी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत व्हावा, ही मागणी रास्त असून, यासाठी आवश्‍यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 

बारामतीत टकारी समाजाच्या मेळाव्यामध्ये रविवारी पवार बोलत होते. टकारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेव जाधव यांनी प्रारंभी टकारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये कसा समावेश केला जाऊ शकतो, याचे सादरीकरण केले. या बाबत पंधरा पुरावे सरकार व प्रशासनाकडे सादर केले आहेत. नव्वद टक्के काम यातील पूर्णत्वास गेले असून आता टकारी समाजबांधवांनी एकत्र येत हा लढा तीव्र करण्याची गरज जाधव यांनी बोलून दाखविली. 

टकारी समाजाचे बारामतीच्या विकासातील योगदान अनन्यसाधारण आहे. या बाबत अजित पवार यांनी भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, ओंकार जाधव, संतोष पोपट जाधव, बाळासाहेब (अनिल) गायकवाड, गणेश हरिभाऊ गायकवाड, विस्तार अधिकारी संजय जाधव, महेंद्र गायकवाड, सुरेंद्र गायकवाड, श्‍याम जाधव, प्रशांत जाधव, महेश गायकवाड, विलास गायकवाड, रमेश गायकवाड, संजय जाधव, सुभाष जाधव, प्रल्हाद जाधव, सुनील गायकवाड, राहुल गायकवाड, अनिल जाधव, संजय गायकवाड, शेखर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी या मेळाव्यासाठी सहकार्य केले.