तरूणीचे अश्लील फोटो काढून मालमत्ता बळकावली

संदीप घिसे 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

तरुष ऊर्फ शीबू सिद्दीकी आणि रक्षी शीबी सिद्दीकी (रा. गोविंदपूर कॉलनी, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या दांपत्याचे नाव आहे. याबाबत २९ वर्षीय पिडित तरूणीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी (पुणे) : तरुणीच्या नकळत तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढण्यात आले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले. याच फोटोच्या आधारे तिच्यावर बलात्कार केला. तसेच पिंपळे सौदागर येथील तिचा अर्धा फ्लॅट  बक्षीस पत्र म्हणून लिहून घेतला. याप्रकरणी दांपत्यावर सांगवी पोलीस गुन्हा दाखल केला आहे.

तरुष ऊर्फ शीबू सिद्दीकी आणि रक्षी शीबी सिद्दीकी (रा. गोविंदपूर कॉलनी, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या दांपत्याचे नाव आहे. याबाबत २९ वर्षीय पिडित तरूणीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा वर्षांपूर्वी सिद्दीकी दाम्पत्याने पीडित महिलेच्या नकळत तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले सदरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतले. 

तसेच पिंपळे सौदागर येथील अर्धा फ्लॅट बक्षिस पत्राद्वारे लिहून घेतला. याशिवाय तिच्यावर बलात्कार करून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. याबाबत पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून पिडित तरूणी व तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अधिक तपास सहायक निरीक्षक अलका सरग करीत आहे.

Web Title: Take away obscene photos of girl and take property in Pimpri