थंडीत व्यायाम... काळजी घ्या !

थंडीत व्यायाम... काळजी घ्या !

पुणे - हिवाळा सुरू झाल्यावर व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढते अन्‌ जिम, मैदानेही बहरलेली दिसू लागतात. चालणाऱ्यांचीही संख्या रस्त्यावर वाढू लागते, तर काही जण सायकलिंगचा आधार घेतात. परंतु व्यायामाचा अतिरेक केला, तर तो उपायकारक ठरण्याऐवजी अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे व्यायामासाठी मार्गदर्शन आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

थंडीच्या हंगामात टेकड्या व्यायामासाठी भरू लागतात. तर जिममध्ये प्रवेश घेणाऱ्यांचीही संख्या दुप्पट होऊ लागते. फिरायला जाणाऱ्यांचीही गर्दी वाढते अन योगासनांच्या वर्गातही भर पडते. ऋतुमानानुसार थंडीमध्ये उत्साह असतो. अनेकदा अचानक व्यायामाला सुरवात केल्यावर ताण पडून स्नायू ताणले जातात किंवा दुखावतात. पाठ, पाय यांचीही दुखणी उद्‌भवू शकतात. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

काय काळजी घ्यावी?
व्यायामाची सुरवात हलक्‍या व्यायाम प्रकारांनी करावी
हात, पाय, मान, कंबर यांचा निदान २० मिनिटे व्यायाम असावा
आकर्षक शरीरयष्टीपेक्षा निरोगी शरीरसंपदेचे उद्दिष्ट असावे 
व्यायाम झाल्यावर लगेच कोणतेही पदार्थ खाऊ नयेत
व्यायामापूर्वी किंवा नंतर एकदम पाणी न पिता व्यायाम करताना थोडे थोडे पाणी प्यावे
सपाट रस्त्यावर किंवा मातीच्या मैदानावर चालणे उत्तम 

आजची तरुणाई व्यायामाबाबत जागरूक होत आहे. परंतु आपल्या शरीराच्या रचनेनुसार आणि योग्य काळजी घेऊन व्यायामात सातत्य राखणे गरजेचे आहे. निरोगी शरीर, हे उद्दिष्ट असले पाहिजे. 
- डॉ. अजय चंदनवाले 

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. त्यानुसार आहार, विहार आणि व्यायाम वेगळा असतो. आपल्या शरीराची गरज आणि रचना लक्षात घेऊन त्याला अनुरूप व्यायाम प्रकारांचा अवलंब केला पाहिजे. 
- डॉ. केशव गुजराथी 

व्यायामात सातत्य आणि नियमितपणा असावा, त्यात एकदम टोकाचे किंवा वारंवार बदल करू नये. नवा व्यायाम प्रकार करताना अतिरेक करू नये. 
- डॉ. शिशिर जोशी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com