केस मागे घेण्यासाठी महिलेच्या डोक्याला लावले पिस्तुल 

crime_logo
crime_logo

पिंपरी (पुणे) : 'माझ्या विरुद्ध केलेल्या सर्व केसेस मागे घे', असे म्हणत एकाने महिलेच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. ही घटना हिंजवडी येथे घडली.

शिखर शरद सिंग (वय ३० रा. हिंजवडी. मुळगाव न्यू नारायण नगर, लखनऊ, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता. १०) फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या मुलासोबत चहा पिण्यासाठी हिंजवडी टाऊनशिप येथे आल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर एका मुलीसह आलेल्या आरोपीने 'तू माझ्या विरोधात केलेल्या सर्व केसेस मागे घे,' असे म्हणत आरोपीने त्यांच्याकडील बॅगेमधून पिस्तुल काढून फिर्यादी महिलेच्या डोक्याला लावली. 'तुला खल्लास करतो', असे म्हणत महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुचाकीवरून सोबत असणाऱ्या मुलीसह निघून गेला. उपनिरीक्षक गबाले याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com