थंडीत घ्या आरोग्याची काळजी

थंडीत घ्या आरोग्याची काळजी

पुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा चाहूल लागली आहे. एरवी उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली, तरीही ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते बरं का? त्यामुळे हिवाळ्याचा आनंद लुटायचा असेल, तर तुम्हीही ‘फिट’असायला हवं! त्यासाठी चला मग जाणून घेऊ, या थंडीमुळे आरोग्याची काळजी कशी घ्यावी.

हिवाळा हा ऋतू खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. कारण थंडीत प्रचंड भूक लागते, त्यामुळे आहारही चांगला राहतो. तंदुरुस्त राहण्यासाठीचा हा ऋतू. परंतु, थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्‍यताही असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे साधारणपणे दिवाळीनंतर सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे अशा तक्रारी डोके वर काढतात. थंडीत ताप येणे, श्‍वसनविकार, दमा, कोरडा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. शीतपेये, शीतपाणी किंवा वातानुकूलित यंत्रणेमुळे काहींना ॲलर्जीदेखील होऊ शकते.

थंडीच्या लाटेचा फटका नागरिकांना बसू शकतो. परंतु, पुण्यात तीव्र अशी थंडीची लाट येत नाही, त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही. हवामानातील बदलांमुळे या दिवसांत शीतपेय, शीतपाणी, वातानुकूलित यंत्रणा यामुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. हवेतील प्रदूषणामुळे घसा दुखणे, याबरोबरच अन्य श्‍वसनाचे आजार उद्‌भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी थंडीत घराबाहेर पडताना गरम कपडे वापरावे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महानगरपालिका

...ही काळजी घ्यावी?
थंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबरच फलाहार, सुकामेवा हे उपयुक्त ठरेल. 
नियमित व्यायाम, वॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. 
शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे.
या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते. 
रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com