खोदाई शुल्काबाबत बैठक घ्या - साबळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या खोदाई शुल्कामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे भारत संचार निगमला शहरात काम करता येत नाही. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी भारत संचार निगम आणि महापालिका यांनी समन्वय बैठक घ्यावी, अशी सूचना खासदार अमर साबळे यांनी केली. 

महापालिकेकडून आकारण्यात येणारे खोदाई शुल्क भरमसाट असल्यामुळे बीएसएनएलला शहरात नवीन टेलिफोन कनेक्‍शन देता येत नसल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. 

त्यानंतर गुरुवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेकडून रस्ता खोदाईसाठीचे दर वेगळे आहेत. भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी आहे, त्यांना महापालिकेकडून सहकार्य होणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्याने त्यांचे काम रखडले आहे. 

दरम्यान, भारत संचार निगम लिमिटेडने या संदर्भात महापालिका आयुक्‍तांना प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यावर चर्चा झाली नसल्याचे भारत संचार निगमच्या पुणे विभागाचे प्रधान महासंचालक अरविंद वडनेरकर यांनी सांगितले. भारत संचार निगमचा विषय मार्गी लावण्यासाठी आपण महापालिका आयुक्‍तांशी बोलू, असे आमदार विजय काळे यांनी सांगितले. 

Web Title: Take a meeting for excise duty