खबरदार ! सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

फेक मेसेज पाठवणाऱ्याविरुद्ध सायबर गुन्हे शाखेमार्फत शोध घेऊन कारवाई करणार : जिल्हाधिकारी

पुणे : कोरोना संदर्भात सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्या व्यक्तींचा सायबर गुन्हे शाखेमार्फत शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'कोरोना विषाणूचा संसर्ग लवकरच तिसऱ्या टप्प्यात पोचेल...'अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आले आहेत. या चुकीच्या मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा मेसेज चुकीचा आहे. अशा स्वरूपाचे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर वायरल करणाऱ्या व्यक्तींचा सायबर गुन्हे शाखेमार्फत शोध घेण्यात येईल. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांमार्फत गांभीर्याने दखल घेण्यात येत असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राम यांनी दिला आहे.

Pune Collector Naval Kishore Ram among the list of 50 popular ...
-------------- 
मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
--------------
मोदींच्या भाषणावर राहुल गांधीना आठवला जुना शेर; काय आहे तो शेर?
--------------
या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश किंवा माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: take Strict action against fake message sender says collector

टॅग्स
टॉपिकस