विकासकामे दर्जेदार होण्यासाठी दक्षता घ्या - रोहित पवार 

संतोष आटोळे 
शनिवार, 9 जून 2018

शिर्सुफळ (ता.बारामती) येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे नवनिर्विचित सरपंच आप्पासाहेब आटोळे, उपसरपंच अनुसया आटोळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, नवनिर्वाचित सदस्य, बांधकाम विभागाचे उपअभियंता कोकणे, ग्रामसेवक दत्तात्रय धावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शिर्सुफळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन गटातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करुन घेतला जात आहे. यावर ग्रामस्थांनी कामे दर्जेदार करुन घेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले.

शिर्सुफळ (ता.बारामती) येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे नवनिर्विचित सरपंच आप्पासाहेब आटोळे, उपसरपंच अनुसया आटोळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, नवनिर्वाचित सदस्य, बांधकाम विभागाचे उपअभियंता कोकणे, ग्रामसेवक दत्तात्रय धावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोहित पवार यांनी सर्व ग्रामस्थांनी गटातटाचे राजकारण न करता विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी दलितवस्ती सुधार योजनेंर्तगत नालंदानगर येथे भुमिगत गटार योजना, खंडोबानगर येथे पाण्याची टाकी, नागरी सुविधा निधी अंर्तगत वाणीआळी ते बॅक ऑफ बडोदा रस्ता कॉक्रेटीकरण, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातुन बांधण्यात येणाऱ्या भक्तनिवास, व ग्रामनिधीतुन महादेव मंदिर संरक्षक भिंत या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

सर्वाधिक विकास कामे मार्गी...  
बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गुणवडी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करणारे रोहित पवार यांच्या प्रयत्नातुन मोठ्या प्रमाणावर विकास निधी मिळाला आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात सर्वाधिक विकासकामे होणारा गट म्हणुन हा गट ओळखला जाईल असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Web Title: Take vigil for the development of quality - Rohit Pawar