ऍग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पातील गावांत इजिप्तच्या निर्यातदारांचा दौरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

टाकळी हाजी/आळेफाटा (जि. पुणे) - "सकाळ माध्यम समूहा'तर्फे "सकाळ ऍग्रोवन स्मार्ट व्हिलेज' प्रकल्पामध्ये निवड झालेल्या पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी व पारगाव तर्फे आळे या गावांना इजिप्तमधील निर्यातदार तौफिक अहमद व हातेम इल इझावी यांनी "सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्यासमवेत भेट दिली.

टाकळी हाजी/आळेफाटा (जि. पुणे) - "सकाळ माध्यम समूहा'तर्फे "सकाळ ऍग्रोवन स्मार्ट व्हिलेज' प्रकल्पामध्ये निवड झालेल्या पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी व पारगाव तर्फे आळे या गावांना इजिप्तमधील निर्यातदार तौफिक अहमद व हातेम इल इझावी यांनी "सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्यासमवेत भेट दिली.

हातेम इल इझावी हे इजिप्तमधील पिको ऍग्रीकल्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक; तर अहमद हे "डाल्टेक्‍स कॉर्प'चे व्यावसायिक संचालक आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उत्पादित मालाची पाहणी करत उत्पादन खर्च, एकरी उत्पादन; तसेच बाजारभावाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. नव्या तांत्रिक युगात उत्पादन खर्च व बाजारभाव याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. केळी, कलिंगड, डाळिंब, द्राक्षाच्या बागांना भेट दिली. ठिबकवर पाण्याचे व्यवस्थापन करून घेतलेले नवल जातीच्या मिरचीचे पीक; तसेच कारल्याच्या शेतीची माहिती घेतली. गायीच्या गोठ्याची पाहणी करून पूरक व्यवसाय म्हणून केल्या जाणाऱ्या दुग्धव्यवसायाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. "सकाळ ऍग्रोवन स्मार्ट व्हिलेज' प्रकल्पामध्ये पारगावतर्फे आळे, बोरी बुद्रुक, वडगाव कांदळी, काळवाडी ही जुन्नर तालुक्‍यातील आणि टाकळी हाजी या शिरूर तालुक्‍यातील गावाचा समावेश आहे. अभ्यास दौऱ्यात शिष्टमंडळाने टाकळी हाजीमध्ये "सकाळ'च्या तनिष्का गटाच्या कामांचीही माहिती घेतली.

सध्या देशात संकरित जनावरांचे प्रमाण वाढले आहे. मात्र देशात देशी दूध व देशी तुपाला अधिक मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देशी गायींची पैदास वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन देशी गायींचे दूध शहरात पाठविल्यास चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल.
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

Web Title: takli haji pune news agrowon smart village project egypt exporter tour