टाकवे बुद्रुक - एमआयडीसीतून जमिनी वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

टाकवे बुद्रुक - तळेगांव दाभाडे एमआयडीसी टप्पा क्र. ४ मधुन निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी इ. गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी वगळण्यात येतील असे आश्वासन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी देशमुख यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.   

टाकवे बुद्रुक - तळेगांव दाभाडे एमआयडीसी टप्पा क्र. ४ मधुन निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी इ. गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी वगळण्यात येतील असे आश्वासन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी देशमुख यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.   

निगडे येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदीरामध्ये याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये शेतकरी व अधिकारी यांनी याविषयी सविस्तर चर्चा केली.बागायती शेती, भातशेती वगळण्याची शेतक-यांनी आग्रही मागणी केली.या शिवा ज्या शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनी द्यायच्या नाहीत, अशा जमिनी एमआयडीसी घेणार नाही यावर अधिका-यांनी सहमती दाखविली. व या जमिनी टप्पा क्र. ४ मधुन वगळण्यात येतील असे सांगितले.  

शासनाच्या ववतीने एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकार देशमुख, मावळचे उपविभागीय अधिकार सुभाष भागडे, तहसीलदार रणजीत देसाई, मंडल अधिकारी बोरकर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर तळेगांवचे माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे, उपसभापती शांताराम कदम, भिकाजी भागवत, अॅड. सोमनाथ पवळे, मोहन घोलप, गणेश भांगरे, गणेश कल्हाटकर यानी एमआयडीसी बाबत मनोगत व्यक्त केले.  

दत्तात्रेय पडवळ यांनी नवलाख उंब्रेमधील एमआयडीसी बाबतच्या त्रृटी प्रशासनाच्या समोर मांडल्या. निगडेचे ग्रामपंचायत सदस्य गणेश. भांगरे यांनी संगणीकीकृत ७/१२ तील दोष निदर्शनास आणून दिले. रामचंद्र थरकुडे, मंगेश शेलार, सुरेश ओव्हाळ, सतिश थरकुडे, जालिंदर थरकुडे आदी शेतकऱ्यांनी सुचना केल्या. चारही गावातील ३५० ते ४०० शेतकरी उपस्थित होते. मोहन घोलप यांनो प्रास्ताविक केले. भिकाजी भागवत यांनी सुत्रचालन केले. सुनिल भोंगाडे यांनी आभार मानले.

Web Title: takve budruk - farmers are happy for there land