ओसाड माळरान हिरव्यागार शेतीने फुलवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

आंदर मावळातील बेंदेवाडीच्या शेतकऱ्यांनी ओसाड माळरानावर हिरव्यागार शेतीने फुलवले आहे, यासाठी ठोकळवाडी धरणातून पाच लाख रुपये खर्च करून समूह पाणी पुरवठा योजना राबवली गेली. ओसाड माळरान समृद्ध झाल्याने बाया बापडयांनी समाधान व्यक्त केले. 

टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील बेंदेवाडीच्या शेतकऱ्यांनी ओसाड माळरानावर हिरव्यागार शेतीने फुलवले आहे, यासाठी ठोकळवाडी धरणातून पाच लाख रुपये खर्च करून समूह पाणी पुरवठा योजना राबवली गेली. ओसाड माळरान समृद्ध झाल्याने बाया बापडयांनी समाधान व्यक्त केले. 

येथील शेतकरी पोपट पिंगळे, दत्तात्रेय पिंगळे, अनंता पिंगळे, बबन पिंगळे, मधू लोहट, लहू पिंगळे, लालू लोहट, जानकू पिंगळे, बाळासाहेब पिंगळे असे या शेतकऱ्यांची नावे आहेत. पिढ्यानपिढ्या भाताची लावणी करून त्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर त्यांची गुजराण होत असायची, म्हणून अनेकांनी नोकरी साठी मुंबई शहराची वाट धरली. पण वाढती महागाई, शहरात राहण्याची गैरसोय, कायम नोकरीत शक्यता नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीशी नाळ जखडून ठेवली. त्यातील हे मोजके शेतकरी. 

पावसाळ्यात भात पिकवून त्यावर कसेबसे वर्षभराची शिदोरी सांभाळणारे शेतकरी आता गहू,बाजरी,  परसबी, कांदा, बटाटा, राजमा अशी पिके घेत आहे.यासाठी त्यांनी सुरूवातीला पदरमोड करून आर्थिक भांडवल उभे केले, त्यातून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरून ठोकळवाडी धरणातून पाणी गटाने गावालगत आणले. त्यामुळे गावच्या पाणी पुरवठा योजनेला चाळीस जणांना यातून रोजगार मिळतो.खते,बी बियाणे, खते, औषधे,याचा खर्च वगळता पन्नास हजार रुपये नफा प्रत्येक कुटुंबाला मिळतोय.

शेतकरी महिला सुरेखा पिंगळे म्हणाल्या, "गावासह परिसरातील शेतमजूरीवर काम करणाऱ्या महिलांना एक वेळचे जेवण २०० ते २५० मजूरी दिली जाते.तर पुरुष मजूरांना ३०० रूपये मजुरी दिली जाते. समूह शेती केल्याने ओसाड माळरान हिरव्यागार झाले. तसेच गावातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले. 

उपसरपंच नाथा पिंगळे म्हणाले, "गावा लगतचे  ओसाड माळरान सतत डोळ्यात खुपसत होते, माळरानावर हिरवी शेती फुलवली पाहिजे अशी तळमळ होती. या तळमळीतून समूह शेतीचे महत्व शेतकऱ्यांना पटले, सर्वानी स्वयं प्रेरणेने आर्थिक मोबदला दिला. त्यातून पाणी शेतात आणता आले.सर्व शेतकरी धन,मन ,धन लावून काम करीत असल्याने शेतीची समृद्धी कडे वाटचाल सुरू आहे. 

Web Title: takve budruk news group of farmers together for irrigation