तळवडे सॉफ्टवेअर पार्कला कोंडीचा व्हायरस

तळवडे साॅफ्टवेअर पार्क
तळवडे साॅफ्टवेअर पार्क

पिंपरी : सतत होणारी जड वाहनांची वाहतूक, अरुंद रस्ता, पर्यायी रस्त्याची व्यवस्था नाही, त्यामुळे तळवडे सॉफ्टवेअर पार्कमधील वाहतूक प्रश्‍न गंभीर स्वरूप होत आहे. रोज सकाळी तीन तास, संध्याकाळी पाच तास अशी आठ तास या रस्त्यावर चार किलोमीटर अंतराच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे या परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणारे आयटियन्स हैराण झाले असून, हा प्रश्‍न कधी सुटणार, असा सवाल उपस्थित केला आहे.अनेक वर्षांपासून तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर असून, त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने इथल्या समस्यांमध्ये भर पडताना दिसते. 

अशी होते कोंडी 
तळवडे सॉफ्टवेअर पार्कमधील कोंडीला प्रमुख कारण म्हणजे चाकणकडे ये-जा करणारी जड वाहने. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे आयटी कंपन्यांच्या बस आणि कर्मचारी कोंडीत अडकतात. सॉफ्टवेअर पार्कमधील तळवडे चौक ते त्रिवेणीनगरपर्यंतच्या रस्त्यावर चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या रस्त्यावर दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा असले तरी, सतत लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे ते कायम बंद ठेवावे लागतात. इथल्या मुख्य चौकात कायम वाहतूक पोलिस कार्यरत असतात. चाकणकडून पुण्याकडे जाणाऱ्या नाशिक रोडवरही रोज वाहतूक कोंडी होते. चाकणला कामासाठी जाणारे अनेकजण याच रस्त्याचा वापर करतात. तळवडे चौक ते त्रिवेणीनगरपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक संथ झाली आहे. 

अनधिकृत पार्किंगची समस्या 
तळवडे सॉफ्टवेअर पार्कमधील कंपन्यांच्या बाहेर नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तिथेच दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. गणेशनगर, त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे इथल्या कोंडीत भर पडते.

 
""तळवडे सॉफ्टवेअर पार्कमध्ये रोज सतावणारी कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजनेचे गरज आहे. या भागातून होणारी जड वाहतूक सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेसाठी बंद ठेवल्यास समस्या सुटू शकते. सॉफ्टवेअर पार्कला जोडण्यासाठी पर्यायी रस्ता किंवा उड्डाण पूल बांधण्याची आवश्‍यकता आहे. या परिसरातील रस्त्यांची स्थिती चांगली झाल्यास कायम होणारी कोंडी सुटण्यास मदत होईल,'' असे संगणक अभियंता अमित अपराजित यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com