रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध प्रवाशांचा संताप

गणेश बोरुडे
सोमवार, 11 डिसेंबर 2017

तळेगाव स्टेशन - प्रवाशांची संख्या कमी आणि लोहमार्गाच्या दुरुस्तीनिमित्त रेल्वे प्रशासनाने पुणे-लोणावळा लोकलच्या पाच फेऱ्या रद्द केल्या आहेत. एकीकडे गाड्या वाढविण्याची मागणी असताना काही फेऱ्या रद्द केल्याने नोकरदारांची गैरसोय सुरू आहे. दरम्यान, देखभाली दरम्यानचे अपघात टाळण्यासाठी काही काळापुरत्या फेऱ्या बंद ठेवल्याचे व केवळ रात्री अकराची पुणे- लोणावळा फेरी कमी प्रवासी आणि गुन्हेगारी घटनांमुळे रद्द केल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

पूर्वसूचना न देता लोकल बंद 
- पुणे-लोणावळा : सकाळी 11, 12.15 व 1 
- लोणावळा-पुणे : 11.20 आणि दोन फेऱ्या तात्पुरत्या बंद 
- पुणे-लोणावळा : रात्री अकराची लोकल कायमची रद्द 
- पुणे-लोणावळा : रात्रीच्या दोन फेऱ्या रद्द 

लोकल रद्दचे परिणाम 
- रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसून पर्यायी साधनांचा अवलंब 
- प्रवासी संख्या पुरेशी असतानाही फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचा संताप 
- पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनही (पीएमपी) तळेगाव मार्गावरील बऱ्याच फेऱ्या बंद केल्याने गैरसोय 
- जीव धोक्‍यात घालून खासगी अवैध पर्वाही वाहनांचा अवलंब 
- खोपोलीच्या धर्तीवर तळेगाव नगरपालिकेने तळेगाव ते निगडी आणि तळेगाव ते लोणावळा मार्गावर सार्वजनिक बस सेवा सुरू करण्याची मागणी 

रात्री साडेनऊनंतरच्या पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करून रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासापासून वंचित केले आहे. सामान्य माणसांची ही पिळवणूक आहे. 
- पोपट भेगडे, अध्यक्ष, मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघ 

रात्री पुण्यातून थेट निगडी अथवा तळेगावला पीएमपी मिळत नाहीत. गर्दीत जागा करीत बस बदलत कसेबसे निगडीपर्यंत पोचून, पुढे सहा आसनी रिक्षा किंवा ट्रकने सोमाटणे फाट्यापर्यंत प्रवाशांना यावे लागते. रेल्वेच्या चुकीच्या निर्णयामुळे वेळेच्या अपव्ययाबरोबरच नाइलाजाने धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतो. 
- सुमीत पारखे, नोकरदार 

Web Title: talegaon dabhade local train pimpri passenger