मिसाईल प्रकल्पग्रस्तांची दिवाळी कोरडीच

सुनील वाळूंज
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

तळेगाव दाभाडे - शहरात दिवाळी पहाट सप्तसुरांनी साजरी होत असतानाच मिसाईल प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देणे अवघड झाले. मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर ही समस्या निर्माण झाली, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. मात्र, मिसाईल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्‍न दिवाळीपूर्वी सुटेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, त्यांची दिवाळी कोरडीच गेली. 

तळेगाव दाभाडे - शहरात दिवाळी पहाट सप्तसुरांनी साजरी होत असतानाच मिसाईल प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देणे अवघड झाले. मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर ही समस्या निर्माण झाली, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. मात्र, मिसाईल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्‍न दिवाळीपूर्वी सुटेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, त्यांची दिवाळी कोरडीच गेली. 

भेगडे म्हणाले, ‘‘मनोहर पर्रीकर यांच्या नंतर याचा पाठपुरावा पुन्हा पहिल्यापासून करावा लागणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात ते अडचणीचे झाले आहे. सरकारकडे वाढीव मोबदल्यासंदर्भातील प्रस्ताव तयार आहे. मात्र, या साठी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे लेखी मागणीचे पत्र अद्याप मिळेल नसल्याने प्रस्ताव पाठविण्यात तांत्रिक अडचणी असून, प्रस्ताव पाठविलेलाच नाही.’’

कधी शासन आमचे नाही, तर कधी केंद्रात सरकार नाही, संरक्षणमंत्री बदललेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेळ घेणार आहे, तर कधी प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलणे झाले आहे, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. आता केंद्रात राज्यात सरकार आहे. आमदारही स्वतः भाजपचे आहेत. असे असताना या प्रश्नावर बाळा भेगडे यांनी शहरातील एका शाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यापुढे पदर पसरत सरकार आमचे तर पंतप्रधान मोदींबरोबर असलेले संबंध तुमचे वापरून हा प्रश्न सोडवा, अशी विनवणी केली. या बाबत भेगडे यांनी विचारले असता ते म्हणाले, ‘‘शरद पवार यांना प्रस्तावाची माहिती ई-मेलद्वारे दिली. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.’’

आमदारांना लागले मंत्रिपदाचे वेध
शहरातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर आहेत. यातील काहींना निधी मिळाला आहे. मात्र उद्‌घाटनाला अद्याप मुहूर्त मिळत नाही. चाकण महामार्ग, सोमाटणे-तळेगाव रस्ता, एमआयडीसी-चाकण जोड रस्ता, या अत्यंत गरजेच्या योजनांना विलंब झाल्याने नागरिकांत अस्वस्थता आहे. शहरातील भुयारी गटार योजना, पाणी योजनांना सरकारमान्यता रेल्वे अंडरपास, जिजामाता चौक शॉपिंग कॉम्लेक्‍स, अखंडित वीजपुरवठा यातील काही मंजुरीच्या तर काही प्रकल्प उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र मंत्रिपदाचे वेध लागल्याने आमदारांना उद्‌घाटनांचा मुहूर्त मिळत नसल्याची नगरपालिका वर्तुळासह शहरात चर्चा आहे.

Web Title: talegaon dabhade pune news missile project affected diwali