तळेगावचे उपनगराध्यक्ष शेळके यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

तळेगाव दाभाडे - तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी पदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे दिला असून, जगनाडे यांनी तातडीने राजीनामा मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त केला आहे. आता नवीन उपनगराध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार याबाबत पालिका वर्तुळासह इच्छुक समर्थकांत कमालीची उत्सुकता आहे.

नगरपालिकेत जनसेवा विकास समितीच्या सहकार्याने सत्तेत आलेल्या भाजपने १५ जानेवारी २०१६ ला सत्तेची सूत्रे स्वीकारली. सात जानेवारी २०१७ रोजी जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सुनील शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 

पालिकेत भाजप, जनसेवा विकास समिती, रिपब्लिकन पक्षाची युती असून, सत्तेतील सहभागी सदस्यांना पदाची संधी देण्याचे धोरण ठरले होते. त्यानुसार प्रथम शेळके यांना संधी देण्यात आली होती. 

निवडीनंतर एक वर्षाच्या कालावधीनंतर नवीन सदस्यांना संधी देण्याचे धोरण सुरवातीला ठरले होते. त्यानुसार राजीनामा होणे अपेक्षित होते. मात्र शेळके यांना मुदतवाढ दिल्याची चर्चा होती. 

पक्षाने राजीनामा देण्याबाबत आदेश देताच शेळके यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा जगनाडे यांच्याकडे सुपूर्त केला.

पाच जून रोजी होणार निवड
सुनील शेळके यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी कोणाला संधी देणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आमदार बाळा भेगडे, पक्षाचे पदाधिकारी याबाबत बैठक घेणे अपेक्षित आहे. पाच जून रोजी  स्वीकृत सदस्य निवडी होणार असून, आता उपनगराध्यक्ष निवड  त्यानंतर होणार हे निश्‍चित झाले आहे. या पदासाठी पक्ष कोणाला संधी देणार व किती कालावधीसाठी देणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
नगर परिषदेतील विविध राजकीय आघाड्यांच्या तीनही स्वीकृत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचे दिलेले राजीनामे मंजूर झाले असून, नूतन सदस्य निवडीसाठी ५ जून रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेल्या या निवडीला मुहूर्त मिळाला असून, या पदासाठी इच्छुक असलेल्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

नगर परिषदेत भाजप, जनसेवा विकास समिती व रिपब्लिकन पक्षप्रणीत युतीने सत्तेची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर सात जानेवारी २०१७ रोजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत स्वीकृत सदस्य, उपनगराध्यक्ष निवडीसह विषय समित्या स्थापित करण्यात आल्या. या पाठोपाठ २० जानेवारी रोजी विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षण मंडळ बरखास्तीच्या पार्श्वभूमीवर नाराज सदस्यांना स्वीकृत सदस्यपदाची संधी देण्याचे अलिखित धोरण पक्षांनी ठरविले होते. 

यानुसार भाजपच्या वतीने इंदरमल ओसवाल, जनसेवा विकास समितीच्या वतीने सचिन टकले, तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने विशाल दाभाडे यांना प्रथम संधी देण्यात आली होती. 

एक वर्षाच्या कालावधीनंतर यात बदल करण्याचे संकेत भाजपचे आमदार बाळा भेगडे यांनी दिले होते. यानुसार सत्तेतील सहभागी जनसेवा विकास समितीचे सदस्य टकले यांनी सूचना मिळताच प्रथम राजीनामा दिल्या त्या पाठोपाठ दाभाडे यांनी आठ दिवसांनी राजीनामा दिला होता. सत्तारूढ भाजपच्या कार्ड कमिटीचे ज्येष्ठ पदाधिकारी ओसवाल यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला होता.

संबंधित सदस्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले असून, सदस्य निवडीचे अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आले आहेत. यानुसार गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेल्या निवडीला आता मुहूर्त मिळाला असून, ५ जून रोजी नवीन सदस्य निवडले जाणार आहेत.

Web Title: talegaon deputy mayor sunil shelake resign politics