corona
corona

शिरूर तालुक्यातील या मोठ्या गावात कोरोनाची पुन्हा एन्ट्री  

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे ६० वर्षीय एका पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबधित रुग्णाचा खासगी लॅबमधील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी आज दिली. 

तळेगावात कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळल्याची चर्चा रविवारी सायंकाळी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबधित रुग्णाची चाचणी खासगी लॅबमध्ये झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णाच्या कुटुंबाकडून सोमवारी रिपोर्ट मिळाला आहे. त्यानंतर रुग्णाच्या संपर्कातील ७ लोकांना आरोग्य केंद्राने होम क्वारंटाइन केले आहे. कोरोनाबाधित रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. घोरपडे यांनी सांगितले.

तळेगावात या पूर्वी एप्रिल महिन्यात एकाच घरातील चौघांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, तिघांनी कोरोनावर यशस्वी मत केली आहे. त्यानंतर कोरोनावर मात करण्यात ग्रामस्थ व प्रशासन यशस्वी झाले होते. परंतु, जुलैमध्ये पुन्हा  कोरोनाचा रुग्ण आढळल्याने ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, येथील कोरोना कमिटीचे अध्यक्ष तलाठी ज्ञानेश्वर भराटे यांनी सांगितले की, संबधित कोरोनाबाधित रुग्णाचा खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णाच्या कुटुंबाकडून सोमवारी प्राप्त झाला असून, तो प्रशासनाकडे पाठविला आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले लॉकडाउनचे नियम पाळून शासनाला सहकार्य करावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com