तळेगावकरांनी अनुभवली धुक्‍याची दुलई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - भल्या पहाटे पडलेली धुक्‍याची दुलई, वातावरणातील गारवा आणि सभोवतालचा परिसर न्याहाळीत केलेला आजचा मॉर्निंग वॉक मनाचा उल्हास आणि उत्साह वाढविणारा ठरला. आजची पहाट शहरवासीयांनी अनोख्या पद्धतीने अनुभवली. 

सहा दिवसांपासून क्षणाक्षणाला वातावरणात बदल घडतोय. निसर्गाचा लहरीपणा, त्याचे बदललेले रूप, वेगवेगळ्या रंगांची उधळण, तसेच माळरानावर बहरलेली केसरी रंगाची रानफुले पाहायला घरातून बाहेर पडतात. मोकळे मैदान, टेकडीवरून निसर्गाचे सौंदर्य न्याहाळताना वेगळाच आनंद मिळतो. हिवाळ्याची चाहूल लागताच मॉर्निंग वॉकसाठी घोरवडेश्‍वर, भंडारा डोंगर, चौराई डोंगर, फिरंगाईच्या डोंगरावर गर्दी वाढते. आजही सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी पुणे-मुंबई महामार्ग तळेगाव-चाकण रस्ता, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी धुक्‍याची दुलई अनुभवली आणि अंगाला थंडी अलगद स्पर्श करून गेली. सकाळच्या प्रहरी फुललेली, नटलेली, सृष्टी पाहताना डोळ्याचे पारणे फिटले. रस्त्यावर दाट धुके पडल्याने दिवे सुरू ठेवून संथगतीने वाहतूक सुरू होती.   

Web Title: talegaon news weather fog