इंदोरीच्या तरुणाचा माळवाडीत वार करून खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यालगत माळवाडी येथे इंदोरीतील युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. रोशन ऊर्फ ढंप्या बाळू हिंगे (१८, रा. इंदोरी, मावळ, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यालगत माळवाडी येथे इंदोरीतील युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. रोशन ऊर्फ ढंप्या बाळू हिंगे (१८, रा. इंदोरी, मावळ, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.२८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास रोशन दुचाकीवरून रस्त्याने जात असताना, पाठीमागून आलेल्या एका मारुती-८०० गाडीने दुचाकीला धडक देऊन, त्याला खाली पाडले. त्यानंतर गाडीतून उतरलेल्या तीन ते चार जणांनी त्याचा पाठलाग करीत कोयत्याने सपासप वार करून खून केला. घटनेनंतर थोड्याच वेळात एका कारमधून आलेल्या काही युवकांनी त्याला त्वरित तळेगाव आणि नंतर सोमाटणे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याप्रकरणी रोशनचा मित्र सुनील कैलास कदम (१९, इंदोरी, मावळ, पुणे) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन तपास चालू केला. घटनास्थळी रक्त मांसाचा सडा पडला होता. सकाळी सकाळीच भर वस्तीत एवढ्या भयानक पद्धतीने खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: talegaon station pune news youth murder