तळेगावच्या विद्यार्थ्यांची राजाराम पाटील वृद्धाश्रमास मदत

दत्ता म्हसकर
मंगळवार, 17 जुलै 2018

जुन्नर - बल्लाळवाडी ता.जुन्नर येथील राजाराम पाटील जेष्ठ नागरिक आधार केंद्रास तळेगाव दाभाडे ता.मावळ येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी भेट दिली.

"निराधार आजी-आजोबांसाठी मूठभर धान्य" या उपक्रमांतर्गत मुलांनी ५५० किलो गहू, ज्वारी, तांदूळच्या स्वरूपात धान्य व २५ किलो तूरडाळ, २० स्टीलची ताटे, २० ग्लास, २० वाट्या व चमचे विद्यार्थ्यांनी  शालेय समितीचे उपाध्यक्ष अविनाश पाटील व मुख्याध्यापिका प्रणाली गुरव व शिक्षकांच्या उपस्थितीत दिले.

यावेळी मुलांनी भावगीते, पोवाडे, नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून आजी - आजोबांचे मनोरंजन केले. तसेच त्यांच्या सोबत भोजन घेतले. शिवनेर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तांबोळी, सचिव मंगेश गाढवे, संचालक संदिप पानसरे, मारुती पाटील शिंदे, व्यवस्थापिका मनिषा खिल्लारी, तसेच  रजनीकुमारी झा, विना विश्वकर्मा, युन्नुस पटेल, संदिप कांबळे, संगिता दाभाडे, रंजना पाटोळे आदी उपस्थित होते. 

प्रास्ताविक गोपाळे गुरुजी यांनी केले. सूत्रसंचलन यशश्री आलम, प्रांजल लांडगे यांनी केले.एफ.बी. आतार यांनी आभार मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: talegaon students visits rajaram patil Old age home