भाजपला स्पष्ट बहुमत; पण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

महायुतीला २६ पैकी २० जागा; भाजप शहराध्यक्षांचा पराभव
तळेगाव दाभाडे - नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार चित्रा संदीप जगनाडे या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. यासह भाजप महायुतीने २६ पैकी २० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. मात्र, पक्षाचे शहराध्यक्ष पराभूत झाल्याने ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी परिस्थिती वाट्याला आली आहे.

नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपने जनसेवा विकास समिती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व मनसे अशी महायुती करून निवडणूक लढविली.

मूळच्या तळेगाव शहर विकास समितीमध्ये फूट पडली. सत्तारूढ समितीने तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, विहित नमुन्यात उमेदवारांचे अर्ज दाखल होऊ न शकल्याने समितीच्या उमेदवारांवर ऐनवेळी अपक्ष लढण्याची वेळ आली. भाजपने उमेदवारी नाकारल्याने दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. १३ प्रभागातील २६ जागांकरिता निवडणूक झाली. यामध्ये भाजप महायुतीच्या तीन उमेदवारांची मतदानापूर्वीच बिनविरोध निवड निश्‍चित झाली होती. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा निकालाच्या वेळी करण्यात आली. यात भाजपचे विरोधी पक्षनेते सुनील शेळके, हेमलता खळदे व रोहित लांघे यांचा समावेश आहे. उर्वरित २३ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात होते.

निवडणुकीसाठी ४५ हजार ३०५ मतदारांपैकी ३० हजार ९०७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपने नगराध्यक्षपदासह २० जागा लढविल्या होत्या. यातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार चित्रा जगनाडे यांनी २१ हजार ७११ मते मिळविली, तर विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती (अपक्ष) उमेदवार भारती धोत्रे यांना अवघी ८,६४८ मते मिळाली. १३,०६३ मताधिक्‍याने जगनाडे विजयी झाल्या. जनसेवा विकास समितीचे पाच व एक जागा रिपब्लिकन पक्षाने जिंकली. विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीला (अपक्ष) सहा जागांवर समाधान मानण्याची वेळ आली.

Web Title: talegav nagarparishad election result