भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकावला तालुकास्तरीय चॅम्पियन चषक

pune.jpg
pune.jpg

भिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करत खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. 

इंदापुर तालुकास्तरीय यशवंतराव कला क्रिडा स्पर्धा नुकत्याच येथील क्षीरसागर विदयालयांमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेचे बक्षिस वितरण आमदार दत्तात्रय भरणे यांचे हस्ते यांचे करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण, अजित क्षीरसागर, सचिन बोगावत, धनाजी थोरात, आबासाहेब बडंगर, विजयकुमार गायकवाड, प्रदीप वाकसे, रियाज शेख, तुषार क्षीरसागर उपस्थित होते. आमदार भरणे यांनी सव्वीस हजार रुपये तर हनुमंत बंडगर यांनी अकरा हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीसे सहभागी शाळांना दिली. आमदार भरणे म्हणाले, ''यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धा ही विदयार्थ्यांमधील कला व क्रिडा गुणांना वाव देणारी आहे. यामधुन उत्तम खेळाडु व कलाकार निर्माण होतील. भिगवण जिल्हा परिषद शाळेस चॅम्पियन चषक प्रदान करण्यात आला. मुख्याध्यापक अंजना हेळकर,शिक्षक व विदयार्थ्यांनी चषक स्विकारला. स्पर्धेचे नियोजन गटशिक्षण अधिकारी अशोक काथवटे, विस्तार अधिकारी राजकुमार बामणे व केंद्र प्रमुख नानासाहेब दराडे, प्रमोद कुदळे, देवानंद शेलार यांनी केले. 

क्रिडा प्रकार निहाय तालुक्यातील प्रथम, द्दितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा :
५० मी. धावणे मुले लहान गट : निरगुडे, व्याहळी, लोणी देवकर,
५० मी. धावणे मुली लहान गट : वायसेवाडी, लाकडी, गलांडवाडी
१०० मी. धावणे मुले मोठा गट : भिगवण, शहा
 १०० मी. धावणे मुली मोठा गट : काझड, वायसेवाडी,
चेंडु फेक लहान गट मुले  : मचाले वस्ती, फुले नगर,
चेंडु फेक लहान गट मुली : भरणेवाडी, व्याहळी,
अगोती नं. १.
गोळा फेक मोठा गट मुले : भिगवण, शहा, व्याहळी.
गोळा फेक मोठा गट मुली : भिगवण, मचाले वस्ती, शहा.
उंच उडी धावडी लहान गट मुले : व्याहळी, तक्रारवाडी, लालपुरी.
उंच उडी धावती लहान गट मली :  कुंभारगांव, गलांडवाडी, अशोकनगर.
उंच उडी धावती मोठा गट मुले : पिंपळे, भिगवण, व्याहळी.
उंच उडी धावती मोठा गट मुली : डाळज क्रं १, व्याहळी, लाकडी.
लांब उडी धावती लहान गट मुले : मदनवाडी, व्याहळी, उध्दट.
लांब उडी धावती लहान गट मुली : तक्रारवाडी, टणु, निरवांगी.
लांब उडी धावती मोठा गट मुले : भिगवण, शहा, वायसेवाडी.
लांब उडी धावती मोठा गट मुली : काझड, गलांडवाडी, भरणेवाडी.
कबड्डी मोठा गट मुले : म्हसोबाचीवाडी, तक्रारवाडी,शहा.
कबड्डी मोठा गट मुली : भिगवण, लाकडी, लुमेवाडी,
खो-खो मोठा गट मुले : वायसेवाडी, पोंधवडी, शहा.
खो-खो मोठा गट मुली : वायसेवाडी, काझड, गलांडवाडी.
लंगडी मोठा गट मुले : काझड, डाळज, गलांडवाडी.
लंगडी मोठा गट मुली : डाळज-१, वायसेवाडी, व्याहळी.
भजन लहान गट संयुक्त : भवानीनगर, चव्हाणवस्ती, बोरी.
भजन मोठा गट संयुक्त : पोंधवडी, वायसेवाडी.
लोकनृत्य लहान गट संयुक्त : भिगवण स्टेशन, वायसेवाडी, पिटकेश्वर व काझड.
लोकनृत्य मोठा गट संयुक्त : काझड, व्याहळी, तक्रारवाडी.
लेझीम लहान गट मुले : भोसले वस्ती, कळस, भिगवण.
लेझीम लहान गट मुली : काटी, तक्रारवाडी, अंथुर्ण.
लेझीम मोठा गट मुले : काझड, भिगवण.
लेझीम मोठा गट मुली :  भिगवण, काझड, मचाले वस्ती.
वक्तृत्व लहान गट संयुक्त : भिगवण, काझड, गोखळी.
वक्तृत्व मोठा गट संयुक्त : म्हसोबाचीवाडी, पोंधवडी व व्याहळी, काझड.
तालुकास्तर जनरल चॅम्पियन चषक जि. प. प्राथमिक शाळा भिगवण.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com