भारतीय संगीत चिरंतन - पं. चौधरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - ‘मी परदेशात जरी राहात असलो, तरी मला भारतीय संगीताचा नेहमीच अभिमान वाटतो. याच संगीताने मला खूप काही दिले आहे. भारतीय संगीताला खूप मोठी परंपरा आहे. गुरूंनी त्यांच्या शिष्यांना आपली कला हस्तांतरित केल्यानेच आजही भारतीय संगीत क्षेत्रात नवी सक्षम पिढी तयार होत आहे. त्यामुळेच भारतीय संगीत हे चिरंतन काळ टिकणारे आहे,’’ अशी भावना तबलावादक पंडित स्वपन चौधरी यांनी व्यक्त केली.    

उस्ताद मेहबूब खाँसाहेब मिरजकर यांच्या ५३व्या; तर गुरू उस्ताद मोहम्मद हनीफ खाँ मिरजकर यांच्या चौथ्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘तालविश्व’च्या वतीने आबासाहेब गरवारे महाविद्यालायाच्या सभागृहामध्ये ‘संगीत विरासत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ‘तालविश्व’चे नवाझ मिरजकर, रिझवान मिरजकर, ऊर्जा ध्यान केंद्राचे संस्थापक अप्पासाहेब पांढरे, सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मारणे आदी उपस्थित होते. 

संगीत क्षेत्रात आपल्या तबलावादनाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना ‘तालविश्व’च्या वतीने गौरविण्यात येते. 

या वर्षी तबलावादक पं. स्वपन चौधरी यांना ‘उस्ताद मेहबूब खाँसाहेब मिरजकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी रईस बाले खान व हाफीज बाले खान यांच्या सतार जुगलबंदीने उपस्थित रसिकांची मने जिंकली. 

कार्यक्रमात शेवटी तबलावादक पं. स्वपन चौधरी यांनी आपल्या जादुई तबलावादनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Web Title: Talvishwa Event Swapan Chaudhary