ताम्हिणीत २४ तासांत ३४८ मि. मी. पाऊस

Rain
Rain

माले - मुळशी धरण भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ताम्हिणी येथे शुक्रवारी चोवीस तासांत तब्बल ३४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दावडी, शिरगाव, आंबवणे येथेही दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

डोंगराळ भागात चोवीस तासांत दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास परिसरात दरडी कोसळण्याची शक्‍यता असते. धरण भागातील पाचपैकी चार पर्जन्यमापक केंद्रांच्या परिसरात २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली; तसेच मुळशी धरण भागातील कोकणाकडे जाणारा रस्ता हा धरणाचा पाणीसाठा व डोंगरांच्या कडेने जात असल्याने दरड कोसळण्याची शक्‍यता असते. चाचिवली, डोंगरवाडी, ताम्हिणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वेळोवेळी घडल्या आहेत. याबाबत वाहनचालकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे.पुणे-कोलाड रस्त्याच्या अर्धवट कामामुळे; तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या जोरदार पावसामुळे मुळशी धरणात पाणी येण्यास सुरवात झाली असून, पाणीसाठा १.०३ टक्‍के होऊन ५.४३ दशलक्ष घनमीटर झाला आहे.मुळशी धरण परिसरात गेल्या चोवीस तासांत नोंदलेला पाऊस मिमीमध्ये (कंसात या वर्षीचा एकूण पाऊस) - ताम्हिणी-३४८ (६५७), दावडी-२६२ (५२५), शिरगाव-२४५ (४८४), आंबवणे-२४० (५८३), मुळशी कॅम्प-१३१ (२८०).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com