"तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रम स्तुत्य - आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे -  गणेशोत्सवाच्या काळात पोलिस कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळावी, यासाठी "सकाळ' व रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल यांच्या वतीने राबविण्यात येणारा "तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रम स्तुत्य असल्याचे मत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

पुणे -  गणेशोत्सवाच्या काळात पोलिस कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळावी, यासाठी "सकाळ' व रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल यांच्या वतीने राबविण्यात येणारा "तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रम स्तुत्य असल्याचे मत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते पोलिस कर्मचाऱ्यांना चिक्की वाटप करून या उपक्रमाची सुरवात झाली. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, "फ्रेशक्‍लिक पिझ्झा अँड पास्ता'च्या निधी सरदेसाई, रोटरी डिस्ट्रिक्‍टचे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर, रोटरी क्‍लब पुणे रॉयलचे अध्यक्ष गिरीश देशपांडे, कसबा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सुहास कुलकर्णी, रोटरीचे उदय कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, शोभा नहार आदी  उपस्थित होते. 

""गणेशोत्सव किंवा कोणत्याही उत्सवामध्ये पोलिस कर्मचारी 24 तास रस्त्यावर उभे राहून कर्तव्य पार पाडतात. पोलिसांना चिक्की देऊन त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम "सकाळ' व रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल यांच्याकडून होत आहे. पोलिसांना चिक्की देणे ही एकप्रकारे आपुलकीची भावना आहे. त्यातून पोलिसांची जबाबदारी वाढणार आहे.'' 
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त. 

पोलिसांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. गणेशोत्सवात कर्तव्य बजावताना त्यांना ऊर्जा देण्याचे काम चिक्कीद्वारे होऊ शकेल.'' 
डॉ. शैलेश पालवेकर, रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल. 

Web Title: tandurust bandobast activities in pune