‘तनिष्कां’च्या निवडणुकीत सक्रिय सहभाग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

पुणे - महिलांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी येत्या शनिवारी (ता. १५) होणाऱ्या ‘तनिष्कां’च्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या महिलांनी गुरुवारी सांगितले.

‘सकाळ’तर्फे तनिष्कासाठी राज्यात सर्वत्र निवडणुका होणार असून पुण्यात येत्या शनिवारी सकाळी आठ ते दुपारी दोनदरम्यान आपापल्या भागातील नजीकच्या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यात महिलांनी भाग घ्यायचा आहे. या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसची शहर महिला आघाडी शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणार आहे.

या संदर्भात झालेल्या बैठकीस महिला आघाडी ओबीसी सेलच्या अध्यक्षा उज्ज्वला देशकर, सचिव माधवी खंडाळकर तसेच मनीषा कांबळे, राजश्री कसबेकर, संगीता काकडे, सुप्रिया पिंपळे, निर्मला डेंगळे, शुभदा जव्हेरी, रोहिणी वीर, सुषमा आढाव, अरुणा मोरे आदी सहभागी झाल्या होत्या.
महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, यासाठी ‘सकाळ’चा हा उपक्रम नक्कीच उपयुक्त असून त्यात आम्ही सहभागी होणार आहोत, असे देशकर यांनी सांगितले. आपापल्या परिसरातील महिलांना मतदानासाठी शनिवारी उद्युक्त करणार असल्याचे खंडाळकर, कांबळे यांनी सांगितले. महिला बचत गट, विद्यार्थिनी, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांत सहभागी असलेल्या महिलांनाही या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे पिंपळे यांनी स्पष्ट केले. संपर्कातील महिलांनाही या उपक्रमाची माहिती देऊन यात सहभागी होण्याचे आवाहन करणार असल्याचे जव्हेरी, काकडे, मोरे आणि कसबेकर यांनी सांगितले.
 
उत्स्फूर्त प्रतिसाद
महिलांसाठीच्या या उपक्रमात शहरातील सर्व महिलांनी सहभागी व्हावे, यासाठी उत्स्फूर्तपणे प्रचार आणि प्रसार करण्याची तयारी केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या महिलांनी सांगितले. महिलांची वर्दळ असलेल्या ठिकाणी विविध उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: tanishka election in pune

टॅग्स