तनिष्कांनी बांधल्या पोलिस बांधवांना राख्या

रमेश मोरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी : घरापासुन दुर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस बांधवांना 'सकाळ तनिष्का महिला गटा'च्या वतीने महिला भगिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. सांगवी पोलिस ठाण्यात शिव जिजाऊ प्रतिष्ठान व तनिष्का गटाच्या वतीने दरवर्षी रक्षाबंधणाचा सण साजरा केला जातो. घरापासुन दुर कर्तव्यावर असणारे पोलिस बांधव बहिण्यांच्या या प्रेमामुळे भारावुन गेले होते.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील म्हणाले, समाजातील बंधुभावाच नातं दृढ राहण्यासाठी, शांतता व सुरक्षितेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहु. यावेळी राजश्री पोटे, राधिका घोडके, जयश्री वगनवार, रूपाली जोशी, संगिता कुसाळकर, ऋतुजा बिराजदार, प्रियंका जोशी, हेमा कदम, शितल दातखिळे, योगिता पाटील आदी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी श्रीकांत पाटील, यांच्यासह सर्व पोलिस बांधवांना राख्या बांधल्या.

Web Title: Tanishka women celebrate rakshabandhan with police

टॅग्स