आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात तीव्र दुष्काळ; टॅकर चारा डेपोची मागणी

सुदाम बिडकर
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील नऊ गावांमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टॅंकर व चारा डेपो सुरु करावेत आदी मागण्यांचे निवेदन याभागातील नागरिकांनी आज सोमवारी आंबेगाव/जुन्नर विभागाचे उपविभागीय आधिकारी अजीत देशमुख यांना दिले.

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील नऊ गावांमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टॅंकर व चारा डेपो सुरु करावेत आदी मागण्यांचे निवेदन याभागातील नागरिकांनी आज सोमवारी आंबेगाव/जुन्नर विभागाचे उपविभागीय आधिकारी अजीत देशमुख यांना दिले.

आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज व संचालक भगवान वाघ यांच्या नेतृत्वाखाली लोणीच्या सरपंच ऊर्मिला धुमाळ, अशोक आदक पाटील, बाळशिराम वाळुंज, धामणी सोसायटीचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, संतोष कुरुकुटे, पहाडदर्याचे उपसरपंच पोपट वाघ, रामनळ्याचे उपसरपंच राजेंद्र सिनलकर, मनोज तांबे, भीमाजी आदक, गणपत सिनलकर यांनी आज उपविभागीय आधिकारीअजीत देशमुख यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. 

यावेळी बोलताना अनिल वाऴुंज म्हणाले यावर्षी तालुक्याच्या पुर्व भागात लोणी, धामणी,शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर, मांदळेवाडी, वाळुंजनगर, रानमळा व खडकवाडी परिसरात तीव्र दुष्काळ पडला आहे विहीरी, बंधारे, पाझर तलाव कोरडे पडले आहेत. शेतातील पीके जऴु लागली आहेत. त्यामुळे डींभा उजव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी पुरवठा करावा, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुर करावेत, जनावरांसाठी चारा डेपो सुरु करावेत, यावर्षी दोन्ही हंगामातील पीके वाया गेल्याने शेतीसाठी घेतलेली कर्ज माफ करावीत, कृषीपंपाची वीजबीले माफ करावी, विद्यार्थींची शैक्षणिक फी माफ करावी, रोजगार हमीची कामे सुरु करुन रोजदारांदारास प्रतीदिन 500 रुपये मजुरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या या मागण्या त्वरीत मंजुर करव्यात अन्यथा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तीव्र आदोंलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

याबाबत बोलताना उपविभागीय आधिकारी अजीत देशमुख म्हणाले, ''शासनाने आंबेगाव तालुका मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाच्या यादीत घेतले आहे. त्यामुळे टॅंकरच्या मागणीचे प्रस्ताव आल्यानंतर ते त्वरीत जिल्हाधिकार्यांकडे पाठवले जाईल मांदळेवाडीचा टॅकरचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवला आहे. चाराडेपो बाबत शासनाच्या कोणत्याच सुचना अद्याप प्राप्त नाहीत. तरीही चारा मागणीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येतील. शासन निर्णयानुसार दुष्काळी तालुका म्हणुन सर्व प्रकारच्या उपाययोजणा केल्या जातील , असे सांगितले. 

Web Title: Tanker, Fodder depot demand due to drought in eastern part of Ambegaon taluka