सागरी वीरांगना सोमवारी परतणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पुणे - भारतीय नौदलातील सहा महिला अधिकारी त्यांची साहसक्षमता सिद्ध करीत ‘आयएनएस तारिणी’ या नौकेसह (सेलबोट) जगभर सागर परिक्रमा करून पुन्हा गोव्यात दाखल होत आहेत. सुमारे नऊ महिन्यांच्या सफरीनंतर येत्या २१ मे रोजी गोव्याच्या किनारपट्टीवर त्या पाऊल ठेवतील. त्या वेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या त्यांचे स्वागत करतील.   

‘महादेई’नंतर जगप्रवास करणारी ‘तारिणी’ ही दुसरी भारतीय नौका आहे. गोव्यामध्येच तिची निर्मिती करण्यात आली होती. हॉलंडच्या टोंगा ५६ नौकेच्या धर्तीवर तिची बांधणी करण्यात आली आहे. त्यावर आधुनिक सॅटेलाइट यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याद्वारे जगभरात कुठेही संपर्क साधण्यात येऊ शकतो. ही नौका अनेक चाचण्यांनंतर गेल्या वर्षी नौदलात दाखल करून घेण्यात आली होती.

अनोखी मोहीम 
गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सहा महिला अधिकाऱ्यांना घेऊन ही नौका जगाच्या सफरीवर गेली होती. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, प्रतिभा जामवाल, पी. स्वाती, एस. विजयादेवी, बी. ऐश्‍वर्या आणि पायल गुप्ता यांचा त्यात समावेश होता. या मोहिमेला नाविका सागर परिक्रमा नाव देण्यात आले होते. त्याचे नेतृत्वही महिला अधिकाऱ्यानेच केले आहे. अशाप्रकारची ही पहिलीच मोहीम असल्याचे नौदलाच्या जनसंपर्क विभागातील सूत्रांनी सांगितले.

Web Title: tarini ship navy