‘टाटा’मधील निवृत्तांनी जपला सामाजिक वसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पुणे - एरवी विरंगुळा म्हणून एकत्र भेटणारे ‘टाटा मोटर्स’चे निवृत्त सहकारी या वेळी एका विधायक कार्यासाठी एकत्र आले. जन्मतःच ऐकू न येणाऱ्या मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्या खर्चाचा भार उचलून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला.  

इतर मुलांपेक्षा थोडेसे वेगळे आयुष्य जगणाऱ्या वेल्हे तालुक्‍यातील या  मुलांना जन्मजात कर्णबधिरत्व आहे. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्यावर उपचार करणे त्यांच्या पालकांना शक्‍य नव्हते. ज्ञानप्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या भाग्यश्री पोंक्षे यांनी या मुलांवर उपचार करून त्यांना सर्वसामान्य मुलांसारखे आयुष्य देण्याचा संकल्प केला. पालकमंत्री बापट यांची भेट घेऊन या मुलांच्या व्यथा सांगितल्या. पालकमंत्र्यांनीही तातडीने त्याची दखल घेत आपल्या टाटा मोटर्सच्या निवृत्त सहकाऱ्यांच्या मार्फत या मुलाच्या प्राथमिक उपचाराचा भार उचलला व तातडीने महात्मा फुले वस्तू संग्रहालयात या मुलांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित केले. येथे डॉक्‍टर अविनाश वाचासुंदर यांनी या मुलांची प्राथमिक तपासणी अत्यल्प मोबदल्यात करून पुढील उपचाराची दिशा ठरवली. मदतीसाठी राजीव विळेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: tata retire employee social working