लाला बँकेच्या स्थापनेत व प्रगतीत तात्यासाहेब गुंजाळ यांचे भरीव योगदान : काळे

रवींद्र पाटे
Friday, 23 October 2020

पुणे जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या लाला अर्बन सहकारी बँकेच्या स्थापनेत व प्रगतीत तात्यासाहेब गुंजाळ यांचे भरीव योगदान आहे.

नारायणगाव : पुणे जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या लाला अर्बन सहकारी बँकेच्या स्थापनेत व प्रगतीत तात्यासाहेब गुंजाळ यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्या अकस्मित निधनामुळे सहकार क्षेत्रातील अभ्यासू व निस्पृह व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी भावना लाला बँकेचे अध्यक्ष निवृत्तीशेठ काळे यांनी व्यक्त केली.

मोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी!

लाला बँकेचे माजी अध्यक्ष व शिक्षणमहर्षी तात्यासाहेब गुंजाळ  यांचे नुकतेच निधन झाले.या निमित्त बँकेच्या येथील मुख्य कार्यालयात शोकसभा घेण्यात आली. या वेळी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या वतीने तात्यासाहेब गुंजाळ  यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शोकसभेस उपाध्यक्ष नितीन लोणारी, ज्येष्ठ संचालक मनसुखलाल भंडारी, मथुराबाई बाणखेले, प्रल्हाद बाणखेले, जगदीश फ़ुलसुंदर, अशोक गांधी, सुनीता साकोरे, विमल थोरात, सचिन कांकरिया, नारायणशेठ गाढवे, डॉ. सचिन कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावळकर, सरव्यवस्थापक राजेंद्र कष्टे आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अध्यक्ष काळे म्हणाले ''लाला बँकेचे संस्थापक माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या निधनानंतर बँकेच्या विस्तारात तात्यासाहेब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तात्यासाहेब यांचे निधन झाल्यामुळे बँकेचे नुकसान झाले असून, आमचा मार्गदर्शक  हरपला आहे. तात्यासाहेब यांनी जुन्नर तालुक्यात  जयहिंद उद्योग समुह, जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय, जयहिंद पतसंस्था आदींची स्थापना केली. शिक्षण, सहकार, शेती, राजकारण या सर्व क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. शिवनेर भूषण पुरस्कार देवून राज्य शासनाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कष्टे यांनी केले.

पुण्यातील प्रकार; कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करत बिलांत ७८ लाख जादा आकारल्याचे उघड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tatyasaheb gunjal's significant contribution in the establishment and progress of lala bank says sanjay kale