टाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप

रामदास वाडेकर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत पायपीट करीत यॆणा-या ८१ गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे, त्यापैकी १८ विद्यार्थ्यांना आज पर्यत मदत करण्यात आली. सकाळच्या पुढाकाराने हा उपक्रम येथे राबविला आहे. पुस्तक पेढीच्या धर्तीवर शाळेत सायकल पेढी किंवा सायकल बॅक राबवली जाणार आहे. डी. वाय.

टाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत पायपीट करीत यॆणा-या ८१ गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे, त्यापैकी १८ विद्यार्थ्यांना आज पर्यत मदत करण्यात आली. सकाळच्या पुढाकाराने हा उपक्रम येथे राबविला आहे. पुस्तक पेढीच्या धर्तीवर शाळेत सायकल पेढी किंवा सायकल बॅक राबवली जाणार आहे. डी. वाय. पाटील कॅम्सचे माजी विद्यार्थी कुणाल धोत्रे, गोरख खळदे, स्वप्निल मावळकर, मंदार करांडे, अजिंक्य स्वामी, व पिंपरीतील शीतल खांडेकर यांनी या सायकली स्पॉन्सर केल्या, या महिन्याच्या सुरूवातीला सकाळने शिक्षणासाठी दहा किलोमीटरची पायपीट ही बातमी प्रसिद्ध केली होती,सावित्रींच्या लेकींची व्यधा पासून समाजातील दानशूरांकडून मदतीचा हात पुढे होत आहे. माजी पंचायत समिती सदस्य बाजीराव शेटे यांच्या अध्यक्षेतेखाली सायकल वितरण सोहळा पार पडला. सरपंच दत्तात्रेय पडवळ, सोपान नरवडे, संदीप शेटे, रामदास शेटे, बळीराम मराठे, अनिल बाबर, प्रतिक गिरमे, रोहीत गिरमे आदि उपस्थितीत होते.

सायकल बॅक....
मुख्याध्यापक सावळेराम गावडे म्हणाले,"शाळेत सायकल बॅक केली जाईल, जो विद्यार्थी दहावीची परिक्षा उत्तीर्ण होऊन जाईल, ती सायकल शाळेत पुन्हा जमा करून आठवीत येणा-या विद्यार्थ्याला ही सायकल दिली जाईल, गरजू विद्यार्था पाहून सायकल दिली जाईल. सकाळी पावणे बारा वाजता शाळा भरते, सव्वा पाच वाजता सुटते, मुलांना पायपीट घरी पोहचयला उशीर होतो.
 आरोग्य आणि वेळेची बचत...

एके काळी सायकलचे शहर अशी पुणे शहर व परिसराची ओळख होती, पण सध्या सायचल चालविण्याचे प्रमाण घटते आहे. सायकल चालविली तर वेळेची बचत होईल शिवाय आरोग्य सुधारले.

ऋतिका केदारी (विद्यार्थ्थानी) म्हणाली, सायकल मिळाल्याने वेळेची बचत होईल, पायपीट थांबले चालून चालून थकवा यायचा आता तो थांबेल. अभ्यासाला अधिक वेळ मिळेल, सकाळ मदतीने हा उपक्रम झाला त्या बद्दल सकाळचे आभार. सरपंच दत्तात्रेय पडवळ, रोहीत गिरमे, रामदास शेटे यांची भाषणे झाली. अशोक धनोकर यांनी प्रास्ताविक केले.युवराज सोनकांबळे यांनी सुत्रसंचालन केले. विनय गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: Tavev Budruk - Seventy cycle distributed in the second phase to Savitri