takve-budruk
takve-budruk

टाकवे बुद्रुक - धबधब्याचे पाणी वस्तीत आल्याने महिला समाधानी

टाकवे बुद्रुक - चिरेखाणी आंदर मावळ येथे बारा घरांची वसती आहे. परंतु, येथे पाण्याची समस्या गंभीर आहे. नळ योजना असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे वस्तीवरील महिलांना बरीच पायपीट करावी लागेत. परंतु, एका तरुणाने आपल्या कल्पकतेने सह्याद्रीच्या पठारावरील धबधब्याचे पाणी या वसतीमध्ये आणले आहे. त्याला अनेकांनी श्रमदानाची जोडे दिली आणि ही गोष्टी शक्य करुन दाखविली. त्यामुळे पावसाळ्यातील तरी या महिलांची पायपीट थांबली आहे.  

वस्तीच्या वरच्या अंगाला कोकमाची अडाव असलेला पठारी भाग, त्या चढणावरून सह्याद्रीच्या पठारावरून चिमटयाचा, नाकाडयाचा आणि लांबाचा असे तीन ओढे वेगवेगळे वाहत आले तरी पुढे काही अंतरावर आल्यावर त्यांचा एक मोठा ओढा वाहत ठोकळवाडी धरणाच्या जलाशयात विसवतो. ओढयाचे फेसाळत वाहणारे थंड आणि मधुर पाणी वस्ती आले पाहिजे हा विचार वस्तीत रूचला, लोकवर्गणी आणि श्रमदानासाठी सगळयांचे हात सरसावले.

नवनाथच्या मदतीला महादेव तुर्डे, काळूराम तुर्डे, सुदाम तुर्डे, संदीप तुर्डे, नाथा तुर्डे यांचे हात मदतीला पुढे आले. वाहणा-या ओढयाला दगडीच्या आधाराने बिस्लरीची बाटली पृष्ठभागाकडे कापून बसवली, बाटलीचे झाकण काढून त्याला प्लास्टिकचा पाईप जोडला, एका पाईपाला एक असे पाईप जोडून सुमारे ८०० मीटर अंतर दोन वेगवेगळया लाईनने  नैसर्गिक उताराच्या मदतीने वस्तीत आणाल्या. बारा घरांच्या वस्तीत सव्वाशै पर्यत लोकवस्ती असून या पाण्यावर गावक-यांची तहान भागते, घरगुती वापरायला, धुणीभांडी आणि जनावरांना पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो.

मावळात धो धो कोसळणा-या पावसाचा असाही उपयोग करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. कोणत्याही तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय वस्तीत पाणी आल्याने, किमान चार महिने तरी महिलांची पायपीट थांबेल त्यामुळे मायमाऊल्यांनी समाधान मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com