#TDR ‘टीडीआर’ची परवानगी मुळावर

TDR
TDR

पुणे - मेट्रो मार्गालगतच्या ‘टीओडी’ झोनमध्ये (ट्रॉन्झीट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) ‘टीडीआर’ (हस्तांतरीय विकास हक्‍क) वापरण्यास परवानगी देण्याची केलेली शिफारस महापालिकेच्या मुळावर आली आहे. ‘टीओडी’ झोनमध्ये २५ टक्के ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी देताना ‘टीडीआर’ची बाजारातील किमत विचारात घेऊन त्यापैकी काही रक्कम महापालिकेने स्वत:च्या तिजोरीतून महामेट्रोला द्यावी, अशी सूचना राज्य सरकारने महापालिकेला केली आहे. मात्र, किती टक्के रक्‍कम भरावी, हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे महापालिकेकडून दोन मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी येणार खर्च ‘टीडीओ’ झोनच्या परिसरात देण्यात येणाऱ्या ‘प्रीमिअम एफएसआय’च्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मेट्रो मार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटरच्या रस्तारुंदी आणि प्लॉटचे क्षेत्र विचारात घेऊन मान्य एफएसआय व्यक्तिरिक्‍त प्रीमिअम शुल्क आकरून त्या परिसरात चार एफएसआयपर्यंत बांधकामास परवानगी देण्यास मान्यता दिली होती. तसेच ‘टीओडी’ झोनमध्ये ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी देऊ नये, असा निर्णय घेतला होता.

नदीपात्रात स्टेशन कसे उभारणार 
मेट्रो स्टेशनच्या परिसरात पाचशे मीटर परिघात ‘प्रीमिअम एफएसआय’ वापरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. तसेच महामेट्रोकडून देखील मेट्रो मार्गिकासह स्टेशन कुठे असणार आहेत, यांचे नकाशे दिले असल्याचे समजते. परंतु महापालिकेकडून हे स्टेशन कुठे असणार आहेत, हे प्रसिद्ध केलेले नाही. तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीने मेट्रो मार्गात बदल करून तो नदीपात्रातून नेला आहे. नदीपात्रालगत येणाऱ्या स्टेशनच्या परिसरात त्यांची कशी अंमलबजावणी महापालिका करणार, असा प्रश्‍नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुळात ‘टीओडी’ झोनमध्ये ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव कोणी पाठविला होता. त्यास सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली होती का, महापालिकेचे उत्पन्न कमी होत आहे. त्यात ‘प्रीमिअम एफएसआय’तून येणाऱ्या शुल्कातून काही शुल्क महापालिकेला मिळेल, अशी अपेक्षा होती. आता पालिकेलाच खिशातून पैसे टाकण्याची वेळ येणार आहे. 
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com