खेडमधील शिक्षकांची थकीत बिलांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

दावडी - खेड तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांची विविध बिले अनेक वर्षांपासून थकीत आहेत. ही बिले मिळावीत, अशी मागणी खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव तांबे यांनी केली आहे.

दावडी - खेड तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांची विविध बिले अनेक वर्षांपासून थकीत आहेत. ही बिले मिळावीत, अशी मागणी खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव तांबे यांनी केली आहे.

थकीत बिलांबाबत खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, गटशिक्षण अधिकारी सोपान वेताळ, लेखाधिकारी राजू परदेशी व खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव तांबे यांची सविस्तर चर्चा झाली. सन २००४  ते २०१२ व सन २०१२ ते २०१८ या दोन टप्प्यांतील बिले थकीत असून, सन २००४ ते २०१३ या कालावधीतील बिले मिळण्यासाठी खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने मुंबई उच्च न्यायालयात सन २०१६ मध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या कालावधीतील बिले देण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली होती; परंतु अद्यापही बिले मिळालेली नाहीत. याबाबत आवश्‍यक त्या मान्यता घेऊन सदर बिले अदा करण्याबाबत सकारात्मक भूमिका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी घेतली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय बिल, कर्तव्य कालावधी, अर्जित रजा, वरिष्ठ वेतन श्रेणी, अपंग भत्ता, महागाई भत्ता आदी प्रकारच्या जवळपास २०८ बिलांच्या तपासणीचे काम पंचायत समिती शिक्षण विभाग व अर्थ विभागामध्ये सुरू आहे. 

या वेळी कार्याध्यक्ष सुनील वाघ, उपाध्यक्ष संतोष मांजरे, कोशाध्यक्ष प्रताप आडेकर, सरचिटणीस सुखदेव मुंगसे उपस्थित होते.

Web Title: teacher arrears bill