शिक्षकांना लागू होणार जुनी निवृत्तिवेतन योजना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर आणि तुकड्यांवर एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना सुरू करण्याच्या 
हालचाली सुरू झाल्या आहेत. ही योजना लागू करण्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

पुणे - राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर आणि तुकड्यांवर एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना सुरू करण्याच्या 
हालचाली सुरू झाल्या आहेत. ही योजना लागू करण्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल. अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तारीख आणि टप्पा अनुदान दिल्याची तारीख विचारात घेऊन निवृत्तिवेतन व अन्य उपाययोजना ही समिती सुचवेल. ही समिती तीन महिन्यांत सरकारला अहवाल सादर करेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Old Pension Scheme