शिक्षक भरतीबंदी तत्काळ उठवा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पुणे - दहावीसाठी तोंडी परीक्षा असलीच पाहिजे, शिक्षकाची भरतीबंदी उठवावी, अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण द्यावे, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा, दहावीच्या विद्यार्थ्यांवर उधळली जाणारी गुणांची खैरात थांबविली, तरच त्यांची खरी गुणवत्ता समजेल, अशी आग्रही मते शहरातील पेठा आणि हडपसर भागातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मांडली.

पुणे - दहावीसाठी तोंडी परीक्षा असलीच पाहिजे, शिक्षकाची भरतीबंदी उठवावी, अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण द्यावे, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा, दहावीच्या विद्यार्थ्यांवर उधळली जाणारी गुणांची खैरात थांबविली, तरच त्यांची खरी गुणवत्ता समजेल, अशी आग्रही मते शहरातील पेठा आणि हडपसर भागातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मांडली.

‘सरकारचे शैक्षणिक धोरण, अपेक्षित बदल आणि विद्यार्थी, शिक्षकांसमोरील समस्या’ या विषयांवर ‘सकाळ’ने मुख्याध्यापकांची बैठक आयोजित केली होती. सत्तरहून अधिक शाळांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. शैक्षणिक धोरणातील त्रुटी सांगताना शिक्षण खात्याकडून लादल्या जाणाऱ्या विविध कामांचा अध्यापन आणि गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. शिक्षण विभागाकडून येणारे आदेश अनेक वेळा तोंडी वा व्हॉट्‌सअॅपच्या माध्यमातून येतात. कोणतीही माहिती भरण्यासाठी किमान कालावधी दिला जातो, काही माहिती दोन दिवसांत मागितली जाते, सरल प्रणालीमध्ये माहिती भरण्याचे बंधन आहे. याचा विपरित परिणाम अध्यापनावर होतो. शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळेल, अशी सुधारणा त्यात केली पाहिजे, अशी मते त्यांनी मांडली.

शिक्षक भरतीबंदी असल्याने अनेक शाळांतील एका विषय शिक्षकाला अन्य विषय शिकवावे लागतात. विद्यार्थ्यांसाठी हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने तातडीने भरतीबंदी उठवावी. दहावीचे निकाल वाढविण्यासाठी तोंडी परीक्षेत जास्त गुण दिले जात असल्याने ही परीक्षा आता होणार नाही; परंतु विद्यार्थ्यांची मौखिक तयारी तपासण्यासाठी या परीक्षा गरजेच्या आहेत. त्याचे गुणदान योग्य पद्धतीने होण्यासाठी बाह्यपरीक्षक पाठवावेत; पण ही परीक्षा सुरू ठेवावी, अशी आग्रही मागणी मुख्याध्यापकांनी केली.

सरकारला सूचना
    विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिकण्यास प्रवृत्त करा.
    कृतिपत्रिका कशा प्रकारे निघतील, याचे आधीच मार्गदर्शन करा.
    अभ्यासक्रमाचे बदल हे पहिलीपासून सुरू करावेत, रचनेत संगती असायला हवी.
    अभ्यासक्रम तयार करणारे शिक्षक अनुभवी हवेत.
    शिक्षकांना ‘यशदा’तील तज्ज्ञांमार्फत तंत्रशुद्धपणे प्रशिक्षण द्यावे.
    शिक्षक भरतीवरील बंदी तत्काळ उठवा किंवा शाळांना तरी जागा भरण्याची मुभा द्या.

Web Title: teacher recruitment ban