#शिक्षकभरती शिक्षक भरतीसाठी बेमुदत उपोषण

#शिक्षकभरती शिक्षक भरतीसाठी बेमुदत उपोषण

पुणे - राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला पवित्र पोर्टलद्वारे सुरवात झाली असली, तरी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे बिंदुनामावली अद्यापही अपूर्ण आहे. परिणामी, ही प्रक्रिया लांबत चालली आहे. या निषेधार्थ भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी शिक्षण संचालनालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

राज्यात शिक्षक भरतीसाठी रिक्त असलेल्या २४ हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित, अनुदानास पात्र असलेल्या संस्थांच्या रिक्त पदावर शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात यावे, बिंदुनामावली अद्यापही पूर्ण झाली नसून, त्या संदर्भात अधिकाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी, बिंदुनामवली प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागा पोर्टलवर अपलोड करून भरती तत्काळ सुरू 

करावी, या मागण्यांसाठी डी. टी. एड., बी. एड. स्टुडंट असोसिएशनच्या वतीने हे उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणात जवळपास दोनशेहून अधिक उमेदवार सहभागी झाले आहेत.

शिक्षक भरतीसंदर्भात अनेक वेळा तोंडी आश्‍वासने देण्यात आली; परंतु प्रत्यक्षात त्यांची पूर्तता झाली नाही. आताही ११ फेब्रुवारीदरम्यान जाहिरात काढण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून जाहिरात काढण्याचे लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार आहे.
- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी. टी. एड., बी. एड. स्टुडंट असो. 

शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून, मागासवर्गीय कक्षामध्ये बिंदुनामावलीला मान्यता देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ग्रामविकास विभागाच्या आंतर जिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर बिंदुनामावलीला मान्यता देऊन भरतीची जाहिरात काढण्याचे काम पुढील आठवड्यात करण्यात येईल.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com