#शिक्षकभरती : गुरुजींची ससेहोलपट!

Teacher-Recruitment
Teacher-Recruitment

पुणे - राज्य सरकारच्या शिक्षण खात्यात त्यांनी आठ वर्षांपूर्वी सीईटी दिली. त्यात ते पात्र ठरले. त्यानुसार त्यांना नियुक्ती देण्यात आली; पण अजूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांना नियुक्तीचे पत्र दिले जाते; पण तिथे जागा रिक्त नसल्याचे उत्तर मिळते. गेली तीन वर्षे २५१ तरुणांची नोकरीसाठी पायपीट सुरू आहे.

डी. एड. झालेल्या उमेदवारांसाठी शिक्षण विभागाच्या केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा २०१० मध्ये झाली होती. या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली. त्यावर, गुण फेरपडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. सुमारे तीन हजार १३९ जणांना नियुक्ती देण्याचा न्यायालयाचा आदेश होता; परंतु यातील २५१ जण अजूनही नोकरीसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयात हेलपाटे मारत आहेत. 

संचालनालयातून त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्तीचा आदेश दिला जातो; परंतु तेथे हजर होण्यासाठी गेल्यावर जागा रिक्त नसल्याचे सांगितले जाते. हे उमेदवार दुसऱ्या नियुक्ती पत्रासाठी पुन्हा संचालनालयाकडे धाव घेतात. गेल्या तीन वर्षांपासून केवळ हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार त्रस्त तरुणांनी केली आहे. जागा रिक्त नाही, तर नव्याने सुरू झालेल्या पवित्र प्रणालीद्वारे तीन हजारांहून शिक्षकांना कशी नियुक्ती देण्यात आली, अशी विचारणाही ते करीत आहेत.

राज्य सरकारकडे २५१ जणांना प्राधान्याने पदस्थापना देण्याविषयी संचालनालयाने २२ जुलै रोजी प्रस्ताव पाठविला आहे. मी स्वत: वैयक्तिक त्याचा पाठपुरावा करीत आहे. त्यांना लवकरच नियुक्ती मिळेल.
- दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com