भरतीच्या नियुक्‍त्या रखडल्या (व्हिडिओ)

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत - पवित्र पोर्टलद्वारे निवड होऊनही नियुक्‍तीपत्र न मिळाल्यामुळे सोमवारी शिक्षण आयुक्‍त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करताना निवड झालेले उमेदवार.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत - पवित्र पोर्टलद्वारे निवड होऊनही नियुक्‍तीपत्र न मिळाल्यामुळे सोमवारी शिक्षण आयुक्‍त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करताना निवड झालेले उमेदवार.

पुणे - राज्यात पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील घोळामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्‍त्या रखडल्या आहेत. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत या निवड झालेल्या उमेदवारांनी सोमवारी (ता. ११) शिक्षण आयुक्‍तालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान, या प्रश्‍नावर एक डिसेंबरपर्यंत तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिले.

राज्य सरकारने काही वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती प्रक्रिया राबविली. यावर्षी ऑगस्ट महिन्यात राज्यात पाच हजार ८२२ जणांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार पालिका आणि अन्य सरकारी शाळांमध्ये या उमेदवारांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या; परंतु मुंबई महापालिकेतंर्गत शाळांसाठी निवड केलेल्या ४८३ जणांपैकी केवळ ३४ जणांनाच नियुक्‍ती पत्र देण्यात आले. या निवड यादीमध्ये काही चुका झाल्याचे कारण देत प्रशासनाने नियुक्‍ती पत्रे दिली नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून या नियुक्‍त्या रखडल्या आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेरोजगारीची टांगती तलवार असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. 

दरम्यान, राज्यातून आलेल्या या उपोषणकर्त्यांनी सायंकाळी शिक्षण आयुक्‍त सोळंकी यांना निवेदन दिले. येत्या दहा दिवसांत संबंधितांना नियुक्‍ती पत्र देण्यात यावे. नियुक्‍ती पत्र न मिळाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा रोशन कुऱ्हाडकर, अस्मिता रोकडे, स्वाती शिंदे, बाळासाहेब भुसारे, लता कांबळे, पूनम स्वामी, पूनम पवार, ज्योती पवार, रूपाली जाधव, राहुल पाटील यांच्यासह इतरांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com