शिक्षक, शिक्षकेतरांचे ऑगस्ट महिन्याचे पगार रखडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ‘शालार्थ’ वेतन प्रणालीमार्फत होत होते. मात्र, सध्या ही प्रणाली बंद करण्यात आली आहे. परिणामी शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या ऑगस्ट महिन्याच्या पगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेली चार वर्षे शालार्थ प्रणालीमार्फत राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांचे पगार होतात; परंतु राज्य सरकारने खासगी सॉफ्टवेअर कंपनीशी करार संपुष्टात आणल्याने ‘शालार्थ’ वेतन देयक प्रणाली बंद करण्यात आली आहे. 

नवीन वेतन प्रणाली एनआयसीद्वारे विकसित करण्याचे सरकारने ठरवले. तोपर्यंत ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन वेतन देण्याचे आदेश सरकारने वेळोवेळी काढले होते. शेवटच्या आदेशानुसार जुलै २०१८ अखेरपर्यंतच्या पगाराबाबतचे आदेश होते. मात्र, त्यापुढील आदेश नसल्याने ऑगस्ट २०१८ च्या पगाराबाबत पूर्ण राज्यभरातील वेतन पथक कार्यालय निर्णय घेण्यास तयार नाही. सरकारच्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनदेखील कोणतेही ठोस आदेश नसल्याने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक; तसेच उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांचे ऑगस्ट २०१८ चे वेतन लांबण्याची भीती शिक्षकेतर संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष प्रसन्न कोतुळकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Teacher Salary Stop